शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गावठी बंदुका तयार करणाऱ्या तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 11:46 IST

बेकायदेशीर गावठी बनावटीची बंदूक विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिताफीने अटक केली. संशयित गोविंद महादेव सुतार (वय ३५, रा. शिवडाव पैकी वांजोळेवाडी, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून नऊ बंदुका व साधनसामग्री असा पाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सर्व बंदुका घरी बनविल्याची कबुली त्याने दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देगावठी बंदुका तयार करणाऱ्या तरुणास अटकनऊ बंदुकांसह साधनसामग्री असा पाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : बेकायदेशीर गावठी बनावटीची बंदूक विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिताफीने अटक केली. संशयित गोविंद महादेव सुतार (वय ३५, रा. शिवडाव पैकी वांजोळेवाडी, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून नऊ बंदुका व साधनसामग्री असा पाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सर्व बंदुका घरी बनविल्याची कबुली त्याने दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरात होत असलेल्या घरफोडी, चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसणेकरिता शाहूपुरी पोलीस ठाण्याचे हवालदार वसंत पिंगळे गस्त घालत असताना त्यांना खबऱ्यांकडून शहरामध्ये एक तरुण १२ बोअरच्या गावठी बंदुका विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना माहिती दिली. त्यांनी कारवाईच्या सूचना देताच सहायक फौजदार संदीप जाधव, वसंत पिंगळे, प्रथमेश पाटील, विशाल चौगले, अशोक पाटील, किरण वावरे, युवराज पाटील, प्रशांत घोलप, नारायण कोरवी, विनायक फराकटे, धर्मेंद्र बगाडे यांनी १ आॅगस्टला मध्यवर्ती बसस्थानक येथे सापळा लावला.

सायंकाळी पाचच्या सुमारास बसस्थानकजवळील परीख पुलाच्या दिशेने एक तरुण हातामध्ये गोणपाट घेऊन संशयास्पद चालत येत असताना दिसला. खबऱ्यांच्या इशाऱ्यानंतर त्याला पकडून गोणपाटची झडती घेतली असता, त्यामध्ये गावठी बनावटीची सिंगल बॅरेलची १२ बोअरची बंदूक मिळून आली. ती विना परवाना असल्याचे निष्पन्न झाले. ती कोठून आणली याबाबत विचारपूस केली असता, घरी स्वत: बनविल्याची कबुली दिली. त्याचे शिवडावपैकी वांजोळेवाडी येथील घरी छापा टाकला असता, बंदूक तयार करण्याचा कारखाना मिळून आला.

कारखान्यात चार, शेतातील शेडमध्ये चार अशा एकूण नऊ बंदुका हस्तगत केल्या. बंदूक तयार करण्याची साधनसामग्री जप्त केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बंदुका बनविण्यासाठी आणखी कोणाचा हातभार आहे, तो साहित्य कोठून विकत घेत होता, याची माहिती पोलीस घेत आहेत.संशयित पाचवी नापाससंशयित गोविंद सुतार हा पाचवी नापास आहे. कोणतेही प्रशिक्षण न घेता दुचाकी पूर्ण खोलून दोन तासांत जोडून देण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे; त्यामुळे परिसरातील दुचाकी दुरुस्तीसाठी त्याच्याकडे रांग लागायची. तो बंदुका दुरुस्ती, साफ करून देण्याचे काम करीत होता. गावातील व परिसरातील काही बंदुका त्याच्याकडे कामाला येत असे. त्या निखळून त्याने पाहणी केली.

त्यामध्ये लागणारे साहित्य खरेदी करून तो स्वत:च बंदुका बनवू लागला. आतापर्यंत त्याने ५० पेक्षा जास्त बंदुका बनविल्याची गोपनीय माहिती आहे. त्या कोणाला विक्री केल्या आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी त्यांनाही पोलीस आरोपी करणार आहेत, असे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.

शिकारीसाठी वापरसंशयित सुतार याच्याकडे लोक शिकारीसाठी बंदुका पाहिजे म्हणून आॅर्डर देत होते. त्यानुसार तो बंदुका बनवून द्यायचा. जप्त केलेल्या बंदुकांचा शिकारीसाठी वापर झाल्याची शक्यता आहे. वनविभागालाही याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवडावपैकी वांजोळेवाडी परिसरात बंदुका कोण वापरत आहेत. त्या परवाना अथवा विनापरवाना आहेत काय, याची स्थानिक पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर