कोल्हापूर : बहिणीला भेटून गावी परतणाऱ्या दोघींच्या मोपेडला भरधाव जीपगाडीची धडक बसल्याने दोघीही बहिणी जखमी झाल्या. ही घटना कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावर पडवळवडी (ता. करवीर) येथे घडली. श्रेया सुनील कांबळे, किरण सुनील कांबळे (दोघीही रा. माले, ता. पन्हाळा) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती की, श्रेया व किरण कांबळे या दोघी बहिणीला भेटण्यासाठी पडवळवाडी येथे आल्या होत्या. त्यांना भेटून पुन्हा गावी जात असताना पडवळवाडीनजीक त्यांच्या मोपेडला समोरून येणाऱ्या जीपने ठोकरले. त्यात त्या दोघीही रस्त्यावर पडल्याने जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून जीपचालक मधुकर रंगराव जाधव (वय ३८ रा. बांबरवाडी, ता. पन्हाळा) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहा. फौजदार निवास पवार करत आहेत.