शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमा आनंदासाठी बनवते : सुमित्रा भावे, किफ्फमध्ये साधला रसिकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 13:13 IST

माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ते बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा आनंद माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आहे अशा भावना ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या. ​​​​​​​

ठळक मुद्देसिनेमे बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आनंद कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत सुमित्रा भावे यांनी साधला रसिकांशी मुक्त संवाद

कोल्हापूर : माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ते बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा आनंद माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आहे अशा भावना ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत त्यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधला. मयूर कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

त्या म्हणाल्या, सिनेमा हे वास्तवातले स्वप्न दाखवताना त्यासाठी करावा लागणारा संघर्ष, प्रामाणिकपणा, सहनशीलता, येणारे अडथळे याचे एकत्रित अनुभव देते. जीवन खोलात समजून घेण्यासाठी सिनेमा महत्वाचा असतो. एखादा चित्रपट बनवण्याआधी मी त्या विषयाचा सखोल अभ्यास करते. उगाच मनोरंजन करायचे म्हणून अनावश्यक गोष्टींना आणि प्रसंगांना त्यात थारा नाही. मला हवा तो संदेश आणि मांडणी यात तडजोड करत नाही, मग तो फार कमी लोकांनी पाहिला तरी मला चालतो. पैसा महत्वाचा असला तरी आनंद हा यामागचा मुख्य उद्देश आहे.त्या म्हणाल्या, प्रत्येक कलावंताकडे तिसरा डोळा असतो आणि तो नैतिकतेचा असतो. त्या नजरेतून तूम्ही सामान्य माणसांकडे पाहायला लागलात की त्यांच्यातील असामान्यत्वाची जाणीव होते. आपण नव्याने माणूस समजायला लागतो. मी जगभर फिरले. तेथील जनजीवन, समस्या, चित्रपटांचे विषय जवळून पाहिले अनुभवले, तेथील तंत्रज्ञान शिकले पण त्या सगळ््या संचिताचा उयोग भारतीयत्वाचे चित्रपट बनवण्यासाठी करते. आपण ज्या मातीतून आलो त्या मातीचा आधी शोध घेतला पाहीजे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूकIFFIइफ्फी