शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मुदतीत आरक्षण द्या, अन्यथा २४ ऑक्टोबरनंतर महागात पडेल; कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा

By पोपट केशव पवार | Updated: October 10, 2023 13:26 IST

मिरजकर तिकटीला जेलभरो आंदोलन

कोल्हापुर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार टाळाटाळ करत असून सत्ताधाऱ्यांनी समाजाला नुसते झुलवत ठेवले आहे. आरक्षणासंबंधी बैठक घेण्याचा शब्द देऊनही तो पाळला जात नाही. सरकारने मनोज जरांगे-पाटील यांना ४० दिवसांची मुदत दिली आहे. त्या मुदतीत आरक्षण द्या, अन्यथा २४ ऑक्टोबरनंतर समाजाचा रोष सरकारला महागात पडेल, असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मंगळवारी दिला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार उदासीन असल्याने सकल मराठा समाजाने येथील मिरजकर तिकटी परिसरात जेलभरो आंदोलन करत सरकारचा निषेध केला. 'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं', 'कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही' 'या सरकारचं करायचं काय' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, बाबा इंदूलकर, आर.के.पोवार, आदिल फरास, दिलीप देसाई, बाबा पार्टे उपस्थित होते. दिलीप देसाई म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचे काम सरकार करत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकात पाटील यांना कोणतेही अधिकार दिले नाहीत. मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा, नसेल तर त्यांना पूर्णत:अधिकार द्यावेत. जरांगे-पाटील यांच्या पाठीशी सकल मराठा समाज ठामपणे उभा आहे. त्यांना दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा शब्द पाळावा. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट)शहराध्यक्ष आर.के.पोवार म्हणाले, सरकारला आरक्षण द्यायचे नसल्यानेच ते चालढकल करत आहेत. सरकार सोंग करत असून त्यांना जागे करण्यासाठी जेलभरो आंदोलन केले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आदिल फरास म्हणाले, सरकार कुणाचेही असो, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्याविरोधात संघर्ष करू. बाबा पार्टे म्हणाले, जरांगे-पाटील यांना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा २४ ऑक्टोबरनंतर समाजाचा रोष सरकारला महागात पडेल. यावेळी अंजली जाधव, सुनिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले. या आंदोलनात चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, माई वाडेकर, अमरसिंह निंबाळकर, वैशाली महाडिक, अविनाश दिंडे यांनी सहभाग घेतला.१४ ला शाहू स्मारकमध्ये बैठकमराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी १४ ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता शाहू स्मारक भवनात बैठक आयोजित करण्यात आल्याचे शिवसेनेचे विजय देवणे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण