शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

हिप्परगी बंधारा, अलमट्टीमधील पाणीसाठा निकषानुसार ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 21:26 IST

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक

इंदुमती सूर्यवंशी ,लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : हिप्परगी बंधारा तसेच अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने घालून दिलेल्या निकषाचे पालन न करता जास्तीत जास्त पाणीसाठा ठेवल्याने कोल्हापूर व सांगलीला महापुराचा फटका बसतो. हे टाळण्यासाठी कर्नाटकमधील या दोन्ही महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठ्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे, त्यावर महाराष्ट्राचे संनियंत्रण असावेत, पावसाळ्यात सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने खुले करावेत, कृष्णा खोरे नदी संघटनेची स्थापना करावी अशी मागणी सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने जिल्हधिकारी अमोल येडगे यांच्याकडे शुक्रवारी केली.

समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, सुयोग हावळ, संजय कोरे यांच्या शिष्टमंडळाने याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करावा, त्यानुसार पाणीसाठ्याचे नियोजन करावे, त्यासाठी कर्नाटक पाटबंधारे विभागाशी चर्चा करावी असा सूचना कोल्हापूर पाटबंधारे विभागाला दिल्या.

समितीने पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील बरगे, दारे तळातून पूर्ण क्षमतेने खुले करून नदीला मोकळे वाहू द्यावे. महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये समन्वय असावा, कृष्णा खोरेचे भाग असलेल्या सर्व राज्यांची केंद्रीय प्रतिनिधित्व असलेलेली कृष्णा खोरे नदी संघटनेची स्थापना व्हावी. पाणीसाठ्यावर आंतरराज्यीय बैठका व्हाव्यात. राजापूर बंधाऱ्यावरून जाणारा विसर्ग अलमट्टी धरणातून खाली सोडावा, कर्नाटककडून हे होत नसल्याने कृष्णा नदीच्या पूर वहन क्षमतेत मानवनिर्मित अडथळे येऊन पाण्याला फुगवटा येतो व महापुराची स्थिती होते असे मत नोंदवले. यावेळी धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, महेश जाधव, एकनाथ माने, महादेव काळे आदी उपस्थित होते.-

हिप्परगी बंधाऱ्याचा परिणामजमखंडी (ता. बागलकोट) येथील हिप्परगी जलसिंचन प्रकल्पात ६ टीएमसी जलसाठा होतो. त्याची पूर्ण क्षमतेची पातळी ५२४.२७ मीटर असून त्यात ५३१.४० मीटर पाणी साठा करू शकतात. महाराष्ट्रातील शेवटचा राजापूर बंधारा हिप्परगीपासून ९२ किलोमीटरवर असून त्याची उंची ५२३.५० मीटर व नदी पात्राची उंची ५१८.९७ मीटर आहे. हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी १ जुलै आल्यावरदेखील सोडले जात नाही, त्यामुळे कोल्हापूर पद्धतीचा शिरोळ बंधारा भरून तेरवाड बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाणी थांबते त्यामुळे पंचगंगेच्या वरच्या भागात राजाराम बंधाऱ्यापर्यंत पाण्याला फुग येते.

--केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार अलमट्टी धरणातील अपेक्षित पाणीसाठा

१ जून ते १५ जून : ५०८.२२ मीटर१६ जून ते ३० जून : ५१३.६ मीटर

१ जुलै ते १५ जुलै : ५१७.११ मीटर१६ जुलै ते ३० जुलै : ५१३.६० मीटर

३० ऑगस्ट : ५१७ मीटर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर