शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कडकनाथ कोंबडी पालन : ‘महारयत अ‍ॅग्रो’चे कोल्हापुरातील कार्यालय सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:18 IST

शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो लि. या कंपनीचे कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कार्यालय शाहूपुरी पोलिसांनी सील केले. त्यातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून सुमारे पाच तास या कार्यालयाचा पोलिसांनी पंचनामा केला.

ठळक मुद्दे‘महारयत अ‍ॅग्रो’चे कोल्हापुरातील कार्यालय सील, कडकनाथ कोंबडी पालन प्रकरणाची व्याप्ती मोठीमहत्त्वाची कागदपत्रे, फाइली जप्त, पाच तास पंचनामा

कोल्हापूर : शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो लि. या कंपनीचे कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कार्यालय शाहूपुरी पोलिसांनी सील केले. त्यातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून सुमारे पाच तास या कार्यालयाचा पोलिसांनी पंचनामा केला.

येथील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना या फसवणुकीच्या गुन्ह्यात साक्षीदार केले आहे. स्टेशन रोडवरील व्हीनस कॉर्नर चौकापासून हाकेच्या अंतरावरील थोरली मशीद इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर २५० स्क्वेअर फुटांचा गाळा या कंपनीने कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर घेतला होता.‘कडकनाथ’ कोंबडी पालन व्यवसायप्रकरणी इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो लि. कंपनीच्या संचालकांविरोधात शेतकऱ्यांची सुमारे तीन कोटी ९४ लाख ५९ हजार ९३० रुपये फसवणूक केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) व इतर संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित मोहिते यांनी कोल्हापुरात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कार्यालय सुरू केले होते. येथून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्त्यांवर संपर्क साधून कोंबडीपालन व्यवसायाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. या फसवणुकीच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे.

विजय विलास आमते (वय ३९, रा. दत्त कॉलनी, सांगावकर मळा, हणमंतवाडी रोड, शिंगणापूर, ता. करवीर) यांची मुख्य तक्रार आहे. यापुढे दाखल होणाऱ्या तक्रारदारांना साक्षीदार केले जाणार आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयितांनी पलायन केले आहे. त्यांचे मोबाईलही बंद आहेत.

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे यांनी सहकाऱ्यांसमवेत थोरली मशीद इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाचा दरवाजा उघडून ते सील केले. लोकांना पुरविले जाणारे फॉर्म, काही नोंदवही, फाइली पोलिसांच्या हाती लागल्या. तेथील शिक्के, लेटरपॅडही पोलिसांनी जप्त केले. येथील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे जबाब घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये साक्षीदार केले. सुमारे पाच तास पंचनामा सुरू होता. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर