शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी ३० हून अधिक जागा जिंकेल, सुषमा अंधारेंनी केला दावा

By पोपट केशव पवार | Updated: April 25, 2024 19:19 IST

निवडणूक आयोग पक्षपाती

कोल्हापूर : ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करुन भाजप आमच्यावर दबाव आणू पाहत आहे. मात्र, ते जितका या यंत्रणाचा वापर करतील तितके लोक अधिक चिडतील असे सांगत शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत राज्यात ३० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा दावा कोल्हापुरात गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.अंधारे म्हणाल्या, ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. विदर्भात मतदानाचा टक्का कमी होण्यामागे केवळ उन्हच कारणीभूत नाही तर इव्हीएमही आहे. लोकांच्या मनात इव्हीएमबाबत अद्यापही साशंकता आहे. त्यामुळे आपण दिलेले मतच अपेक्षित उमेदवाराला जाणार नसेल तर ते द्यायचे कशाला या भावनेमुळे मतदान कमी होत असल्याकडे अंधारे यांनी लक्ष वेधले. धर्माच्या, जातीच्या नावावर मते मागण्यापेक्षा विकासकामावर मते मागा, असा सल्लाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला. स्मार्ट सिटी, दत्तक गाव योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे ९ उदाहरणे दाखवा असे आव्हान त्यांनी महायुतीला दिले. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, अस्मिता सावंत, हर्षल सुर्वे उपस्थित होते.अंधारेंनी नोटिशीला पाठवले उत्तरवर्धा येथील खासदार रामदास तडस यांच्या सूनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे उपस्थित राहिल्याने राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाने त्यांना नाेटीस पाठवली. या नोटिशीला मी गुरुवारीच उत्तर पाठवले असल्याचे अंधारे यांनी सांगितले. मला नोटीस मिळालीच पण मी ज्यांना वारंवार फोन करते अशा ५० लोकांनाही का नोटिसा पाठवल्या असा सवाल त्यांनी केला. पक्षाची भूमिका मांडण्यापासून परावृत्त करण्याबरोबरच माझा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.निवडणूक आयोग पक्षपातीठाण्यात महायुतीचे नेते पैसे वाटतानाचा व्हिडिओ निवडणूक आयोगाला दिला. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना आकर्षित करणारे वक्तव्य केले तरी आयोगाकडून कारवाई झाली नाही. आम्हाला मात्र त्वरित नोटिसा पाठवल्या जातात. हा पक्षपाती असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sushma Andhareसुषमा अंधारे