शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Mahashivratri : तुजविण शंभो मज कोण तारी, कोल्हापूरात महाशिवरात्री उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 18:38 IST

कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणिंद्रमाथां मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदु:खहारी, तुजविण शंभो मज कोण तारी...शिवशंकराची स्तुतीस्तोत्र, ओम नम:शिवायचा जाप, रूद्राभिषेक, बेल, फूल, धूप, आरती, पालखी सोहळा प्रसाद वाटप, भजन, कीर्तन अशा मंगलमयी वातावरणात व धार्मिक उपक्रमांनी मंगळवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूरात महाशिवरात्री उत्साहातपालखी सोहळा प्रसाद वाटप, भजन, कीर्तन मंगलमयी वातावर

कोल्हापूर : कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणिंद्रमाथां मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदु:खहारी, तुजविण शंभो मज कोण तारी...शिवशंकराची स्तुतीस्तोत्र, ओम नम:शिवायचा जाप, रूद्राभिषेक, बेल, फूल, धूप, आरती, पालखी सोहळा प्रसाद वाटप, भजन, कीर्तन अशा मंगलमयी वातावरणात व धार्मिक उपक्रमांनी मंगळवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त अंबाबाई मंदिरातील मातृलिंग भाविकांच्या दर्शनाखाली खुले करण्यात आले. वर्षातून काही महत्त्वाच्या दिवशीच उघडण्यात येणाऱ्या या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अतिबलेश्वर मंदिरातही सकाळी रूद्रपूजा, अभिषेक करण्यात आला. मंगळवार पेठेतील ‘कैलासगडची स्वारी’ मंदिरात पहाटे महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री सत्यसाई सेवा समितीतर्फे महारूद्र पठण झाले.

दुपारी कथा महाभारत ग्रंथाचे नित्य वाचन व सायंकाळी श्री मंगेशलक्ष्मी महिला मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. रावणेश्वर मंदिरात सकाळी सात वाजता लघुरूद्राभिषेक झाला. त्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून ज्ञानेश्वर हंकारे यांचा अभंगवाणी, अमोल बुचडे यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम, स्वानंद महिला भजनी मंडळाचा अभंगवाणी, राजू मेस्त्री यांचे, तसेच अनघा पुरोहित यांचा भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. सायंकाळी यामपूजेला सुरुवात झाली. त्यात शिवमहिम्न स्तोत्र अभिषेक, रूद्राभिषेक व भस्मारती, मध्यरात्री शिवमहिम्न स्तोत्र अभिषेक व बिल्वार्चन पूजा झाली तसेच जागरण करण्यात आले.शुक्रवार पेठ गंगावेशीतील ऋणमुक्तेश्वर मंदिरात सकाळी सहा वाजता महाअभिषेक व महापूजा झाली. सायंकाळी भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. कोल्हापुरातील सर्वांत मोठे शिवलिंग असलेल्या उत्तरेश्वर मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आला. पूजेचे साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि भाविकांच्या गर्दीने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. याशिवाय एस. टी. स्टँड चौकातील वटेश्वर मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होती. आर्ट आॅफ लिव्हिंग व दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगतर्फे दैवज्ञ बोर्डिंग येथे सायंकाळी रूद्रपूजा करण्यात आली. प. पू. श्री. श्री. रविशंकरजी यांचे शिष्य स्वामी ओंकारानंदजी यांनी मार्गदर्शन केले. 

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीkolhapurकोल्हापूर