शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र क्वीन’ची विजयी सलामी : कोल्हापूर वूमेन्स लीग फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:24 IST

कोल्हापूर : मिशेल कास्टान आणि अंजू तमग यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर महाराष्ट्र क्वीन संघाने मल्टी वॉरिअर्स संघावर

ठळक मुद्देछत्रपती शिवकन्या-आर. आर. चॅलेंजर्स सामना गोलशून्य बरोबरीत

कोल्हापूर : मिशेल कास्टान आणि अंजू तमग यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर महाराष्ट्र क्वीन संघाने मल्टी वॉरिअर्स संघावर ३-० अशा गोलने मात करून कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी विजयी सलामी दिली. छत्रपती शिवकन्या संघ आणि आर. आर. चॅलेंजर्स संघातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.

येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर वूमेन्स फुटबॉल क्लबतर्फे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन यशस्वीनीराजे यांनी ‘किकआॅफ’ करून केले. यावेळी मधुरिमाराजे या अध्यक्षस्थानी, तर स्वालिया थोडगे, मृणाल शिंदे, रूक्क्या थोडगे, माणिक मंडलिक, संभाजी पाटील-मांगोरे, राजेंद्र दळवी, मनोज जाधव, नितीन जाधव, प्रमोद पाटील, झुंजार सरनोबत, शरद माळी, आदी उपस्थित होते. विजय साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेतील सलामीचा सामना ‘महाराष्ट्र क्वीन’ आणि ‘मल्टी वॉरिअर्स’ यांच्यात रंगला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी एकमेकांच्या तोडीस तोड खेळ केल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात योग्य चाली रचत ‘महाराष्ट्र क्वीन’ ने सामन्यावर पकड मिळविली. त्यांच्या मिशेल कास्टान हिने सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला पहिला गोल नोंदविला. त्यानंतर अंजू तमग हिने सामन्याच्या ४० व्या आणि ५६ व्या मिनिटाला गोल करून संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.

उर्वरीत वेळेत गोलची परतफेड करण्यात ‘मल्टी वॉरिअर्स’ अपयशी ठरले. त्यामुळे ‘महाराष्ट्र क्वीन’ने विजयी सलामी दिली. त्यांच्याकडून सोनिया राणा, प्रणाली चव्हाण, मिशेल कास्टाना, अंजू तमग यांनी, तर ‘मल्टी वॉरिअर्स’च्या तेजस्विनी कोळसे, पूजा धुमाळ, पृथ्वी गायकवाड, मुस्कान अत्तार, लॉरा इस्टीबोरो यांनी चांगला खेळ केला.

स्पर्धेतील दुसरा सामना ‘छत्रपती शिवकन्या’ आणि ‘आर. आर. चॅलेंजर्स’ यांच्यात झाला. सामन्यात दोन्ही संघांच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी वेगवान चढाया केल्या. मात्र, कधी त्यांच्या बचावफळीने, तर कधी गोलरक्षकाने त्या परतावून लावल्याने पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.या सामन्यात ‘छत्रपती शिवकन्या’कडून मृणाल खोत, ऐश्वर्या हवालदार यांनी, तर ‘आर. आर. चॅलेंजर्स’कडून गोलरक्षक रूपा मलिक, अनुष्का खतकर, प्रतीक्षा मिठारी यांनी चांगला खेळ केला.उत्कृष्ट खेळाडूया स्पर्धेतील पहिल्या सामन्यामधील अंजू तमंग, तेजस्विनी कोळसे आणि दुसऱ्या सामन्यातील मृणाल खोत, गोलरक्षक रूपा मलिक या उत्कृष्ट खेळाडू ठरल्या. त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. 

आजचे सामने :जाधव इंडस्ट्रीज वि. छत्रपती शिवकन्या (दुपारी तीन वाजता)मल्टी वॉरिअर्स वि. आर. आर. चॅलेंजर्स (दुपारीचार वाजता)

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर