कोल्हापूर : ‘लोकमत’ने एखादी गोष्ट मनात आणली की महाराष्ट्रातील हजारो खेड्यापर्यंत ती प्रभावीपणे पोहोचते. हीच लोकमतची ताकद आहे व त्याचे प्रत्यंतर रक्तदान मोहिमेमध्ये येत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कोरोना काळामध्ये राज्यात रक्तटंंचाई असताना ‘लोकमत’ने राबवलेल्या अभियानातून राज्याची रक्ताची गरज भागेल असे प्रशंसाेद्गार त्यांनी काढले.
‘लोकमत’च्या ‘नातं रक्ताचं’ मोहिमेअंतर्गत भाजपच्यावतीने सोमवारी दैवज्ञ बोर्डिंगमध्ये रक्तदान शिबिर झाले. ज्यांनी आस्थेने या रक्तदान मोहिमेमध्ये भाग घेतला. त्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही आमदार पाटील यांनी धन्यवाद दिले. यावेळी ४२ जणांनी रक्तदान करून या मोहिमेला पाठबळ दिले.
संपादक वसंत भोसले म्हणाले, कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात केवळ २० हजार रक्तबाटल्या शिल्लक होत्या, त्यामुळे रक्तटंचाई निर्माण झाल्याने ‘लोकमत’ ने ही समाजाेपयोगी मोहीम हाती घेतली असून त्यास राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, सचिन तोडकर, आशिष कपडेकर, सुधीर देसाई, विवेक ओरा, संदीप कुंभार, धीरज पाटील यांनी नियोजन केले. भाजपचे सरचिटणीस गणेश देसाई यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
१२०७२०२१ कोल बीजेपी रक्तदान
‘लोकमत’च्या ‘नातं रक्ताचं’ मोहिमेमध्ये सोमवारी भाजपच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डावीकडून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (छाया आदित्य वेल्हाळ)