शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Maharashtra Vidhan Sabha 2019: 'बाळासाहेब हे दैवत; उमेदवारी मिळाली नाही तरी बंडखोरी करणार नाही!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 13:27 IST

बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत.अडचणीच्या काळात आपण शिवसेनेतून कागल विधानसभा लढवली आहे. आतापर्यंत आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत.त्यामुळे या वेळी ही कागल मधून सेना भाजपा युतीच्या उमेदवारी साठी आग्रही आहे.आणि उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नाही पण तरीही काही वेगळा निर्णय झाला तरी आपण युती धर्म पाळून पक्षाचा आदेश अंतिम मानेन जर युतीची उमेदवारी मिळाली तरच आपण किंवा अमरीश रिंगणात राहू अन्यथा आपण निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट मत माजी आमदार संजय घाटगे यांनी दिले.

ठळक मुद्दे'बाळासाहेब हे दैवत; उमेदवारी मिळाली नाही तरी बंडखोरी करणार नाही!'संजयबाबा घाटगे मुरगूड मधून फुंकणार रणसिंग

मुरगूड : बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत.अडचणीच्या काळात आपण शिवसेनेतून कागलविधानसभा लढवली आहे.आतापर्यंत आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत.त्यामुळे या वेळी ही कागल मधून सेना भाजपा युतीच्या उमेदवारी साठी आग्रही आहे.आणि उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नाही पण तरीही काही वेगळा निर्णय झाला तरी आपण युती धर्म पाळून पक्षाचा आदेश अंतिम मानेन जर युतीची उमेदवारी मिळाली तरच आपण किंवा अमरीश रिंगणात राहू अन्यथा आपण निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट मत माजी आमदार संजय घाटगे यांनी दिले.शिवसेनेचा महाराष्ट्रातील पहिला मी महाराष्ट्र निश्चय मेळावा मुरगूड ता कागल येथे पार पडणार आहे याची माहिती देण्यासाठी येथील नगरपालिका कार्यालयात ही पत्रकार परिषद संपन्न झाली.

या कार्यक्रमासाठी मुंबई येथील सेना भवनातून एक टीम मुरगूड मध्ये आली असून या निश्चय मेळाव्यातून शिवसेना विधानसभेचे रणसिंग फुंकणार आहे.आणि हा मेळावा कागल तालुक्यातील मुरगूड मध्ये पार पडणार असल्याने कागल ची उमेदवारी सेनेलाच मिळणार असल्याचे संकेत या पत्रकार परिषदेत दिसत होते.तसा पक्षाने ग्रीन सिग्नल दिल्याचे ही संजय घाटगे यांनी सांगितले.यावेळी बोलताना संजय घाटगे म्हणाले आपल्या वंचित आघाडीशी संपर्क झाल्याची बातमी तशी खोडकर च होती.असा कोणताही संपर्क झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आदित्य ठाकरे हेच महाराष्ट्राचे भवितव्य आहे.त्यामुळे उमेदवारी मिळो अगर न मिळो आपण शिवसेना सोडण्याच्या प्रश्नच येत नाही असे त्यांनी सांगितले.

जर भाजपा सेना युती झाली नाही तर पक्षाने जबाबदारी दिली तर आपण खासदार संजय मंडलिक यांच्या सहकार्याने सेनेकडून लढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.तर युती कडून आपल्याला उमेदवारी मिळाली तर भाजपकडून इच्छुक असणारे समरजीत घाटगे यांची समजूत काढण्यात वरिष्ठ नेते यशस्वी होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.वरिष्ठ नेत्यांना आणून उमेदवारी मिळावी यासाठी आपण कधीच प्रचंड पैसा खर्च केला नसता आणि करणार नाही कारण आमचे दैवत सर्वसामान्य जनता आहे त्यांचा उत्कर्ष महत्वाचा आहे संस्थेचा पैसा हा संस्थेसाठी किंवा जनतेसाठीच खर्च होणे अपेक्षित आहे राजकारणावर खर्च होणे हे आपल्याला पटत नाही असे सांगून कागल मध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांची त्यांनी खिल्ली उडवली.मागील निवडणुकीत भाजपला तालुक्यात पाच हजार मते पडली आणि आम्हाला साधारण सव्वालाख मते पडली त्यामुळे पक्ष नेतृत्वाला याची माहिती असल्याने कागलची जागा आम्हालाच मिळेल असे सांगून मी काय अमरीश याचा निर्णय पक्ष प्रमुख ठाकरेंच घेतील असे त्यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा नुसार रविवारी होणाऱ्या मुरगुड मधील मेळाव्यात नितीन बानूगडे पाटील हे प्रमुख वक्ते असतील तर खासदार संजय मंडलिक हे अध्यक्ष असतील जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सेने चे सर्व नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार असून मुरगूड विद्यालयाच्या जवळ हा मेळावा सांयकाळी चार वाजता पार पडणार आहे.

 स्वागत नामदेवराव मेंडके यांनी केले.यावेळीअमरीश घाटगे, उपनगराध्यक्ष धनाजी गोधडे, जयसिंग भोसले,धनराज घाटगे,ए.वाय. पाटील,अशोक पाटील,के.के.पाटील, एम.बी.पाटील,महेश देशपांडे,दिलीप पाटील,पंडित बोभाटे, महेश पाटील,रणजित शिंदे,सुशांत पाटील,आदी प्रमुख उपस्थित होते. मुरगूड ता.कागल येथे बोलताना माजी आमदार संजय घाटगे,उपनगराध्यक्ष धनाजी गोधडे, नामदेवराव मेंडके, धनराज घाटगे आदी प्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkagal-acकागलkolhapurकोल्हापूर