शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र हा सीमाबांधवाच्या पाठिशी ठामपणे उभा; उदय सामंत यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 18:14 IST

अर्जुननगर येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन

म्हाकवे - सीमाभागातील सर्वच युवक-युवतींना रोजगार मिळून ते स्वावलंबी झाले पाहिजेत.तसेच येथील प्रत्येक नागरिक  ताठ मानेने जगला पाहिजे.यासाठी संघर्षाची भुमी असणारा महाराष्ट्र हा सीमाभागातील मराठी भाषिकांच्याही पाठिशी ठामपणे उभा राहिल.अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आता प्रत्येक वर्षी शिवजयंती दिनी याच ठिकाणी रोजगार मेळावा घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

   अर्जुननगर (ता. कागल)येथील देवचंद महाविद्यालयाच्या पटांगणात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि देवचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी होते.    खासदार धैर्यशील माने, देवचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष आशिष शाह, दिपक दळवी, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनीही मनोगते व्यक्त केली.यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार, रवींद्र माने, जयराम मिरजकर, लक्ष्मण पाटील यासह सीमाभागातील प्रमुख उपस्थितीत होते.      उद्योजकांना अनुदान... युवकांना समाधानकारक पगाराचीही ग्वाही    खाजगी कंपनीत युवक युवतींना नोकरी देताना समाधानकारक पगारही देण्याच्या सूचना करत सामंत यांनी महाराष्ट्राप्रमाणेच सीमाभागातील उद्योजकांना अनुदान व इतर सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

सीमाभागात लवकरच सीमाप्रश्नी मेळाव्याची घोषणामहाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दळवी यांनी रोजगार मेळाव्याबाबत समाधान व्यक्त करत सीमाप्रश्नाबाबतही मेळावा घेण्याचे आवाहन केले.या संदर्भ घेत सीमाप्रश्नाचे समन्वयक शुभंराजे देसाई, चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित लवकरच सीमाप्रश्नी मेळावा घेण्याची घोषणाही सामंत यांनी केली. 

सामंत यांची अशीही समयसूचकता...     व्यासपीठावर एका बाजूला बसलेल्या दळवी यांना आपल्या नजीकच बसविले.तसेच, संयोजकांनी प्रमुख पाहुणे असणार्या सामंत यांच्या सत्काराची सर्वप्रथम घोषणा केली.माञ, तात्काळ त्यांनी जेष्ठ असणार्या दळवी यांचा सत्कार करण्याच्या संयोजकांना सुचना केल्या.सामंत यांच्या या समयसूचकतेबाबत उपस्थितांनी कौतुक केले.   तुमच्या घोषणा... आमच्या हृदयात...    कारवार,बिदर,भालकीसह बेळगावसह ८६५गावे महाराष्ट्रात दाखल झालीच पाहिजेत... बेळगांव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या.या संदर्भ घेत तुमच्या घोषणा आमच्या हृदयातील आहेत.तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत