शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा उद्या राज्यव्यापी बंद; मुख्यमंत्र्यांचा थेट 'चेंबर' अध्यक्षांना फोन, म्हणाले..

By पोपट केशव पवार | Updated: August 26, 2024 11:55 IST

कोल्हापूर : व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स" च्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने उद्या मंगळवारी महाराष्ट्र ...

कोल्हापूर : व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स" च्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने उद्या मंगळवारी महाराष्ट्र व्यापार बंदचे आवाहन केले आहे.  या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष तथा कृती समितीचे प्रमुख ललित गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत राज्य सरकार व्यापाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे उद्याच्या बंदबाबत व्यापारी  कृती समिती काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 'सेस' रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने उद्या मंगळवारी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे राज्यातील बाजारपेठा, मार्केड यार्ड बंद राहणार आहेत. याचा परिणाम  दैनंदिन सेवेवर  होणार आहे. त्यामुळे  राज्य सरकारने व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे.    सध्या  मुंबईत सह्याद्री अतिथिगृह येथे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची उच्चस्तरीय  बैठक सुरु आहे. ही बैठक संपल्यानंतर कृती समितीचे पदाधिकारी एकत्रितपणे चर्चा करून उद्याच्या बंद बाबतचे पुढील धोरण जाहीर करतील, असे ललित गांधी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदे