शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीच्या पाण्यावर महाराष्ट्राने नियंत्रण ठेवावे, महापूर नियंत्रण समितीची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:26 IST

जिल्हाधिकाऱ्यांसोबत ७ जूनला बैठक

कोल्हापूर : केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात प्रत्येक राज्यातील धरणातील पाणी पातळी किती असावी, हे निश्चित केलेले आहे. त्यानुसार अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी राखण्याचे काम कर्नाटक राज्य करत नाही, असा आरोप महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केला आहे. अलमट्टीच्या पाण्यावर महाराष्ट्राचे नियंत्रण ठेवण्यासाठी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जूनला बैठकीसाठी समितीला निमंत्रण दिले आहे.

यापूर्वी दोन वेळा महापूर आले आहेत. त्यामुळे अलमट्टीच्या पाणी पातळीवर राज्य सरकारने समन्वयाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अशी भूमिका कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवावी, असे निवेदन सोमवारी त्यांनी दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता आणि महापुराचे अभ्यासक विजयकुमार दिवाण, सर्जेराव पाटील, संजय कोरे, प्रदीप वायचळ, सुयोग हावळ उपस्थित होते.

दिवाण यांनी अलमट्टी धरण हेच सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचे मुख्य कारण असल्याचा आराेप केला. या धरणाची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७.४० मीटर ठेवणे बंधनकारक आहे. २०१९ आणि २०२० या दोन्ही वेळी ही पातळी ओलांडल्याने महापूर आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने जलसंपदा विभागाचे अभियंता अलमट्टी धरणावर ठेवून दैनंदिन पाणी पातळी नोंदवावी, कर्नाटकला अलमट्टीमधील पाणी पातळी निर्देशाप्रमाणे ठेवण्यास भाग पाडावे, अशी भूमिका त्यांनी मांडून कर्नाटक सरकार महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाही, आवश्यक माहिती, आकडेवारी देत नाही, असा आरोप केला. दरम्यान, समिती यासंदर्भात ७ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात आपली भूमिका मांडणार असून १६ जूनला नृसिंहवाडी येथे महापूर परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केंद्रीय जल आयोगाने धरणातील पाणीसाठ्याचे नियम बदलावेत, अशी मागणी केली. त्यांच्या मते पावसाचे वेळापत्रक बदलत असते. २५ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यानुसार धरणातील पाणी साठ्याचे नियमही बदलणे गरजेचे आहे. राधानगरी, वारणा या धरणातील विसर्ग पूर्ण झाल्यावर कोयनेमधील विसर्ग केला पाहिजे, अशा पद्धतीने महापूर नियंत्रित करता येऊ शकतो, हे आम्ही दाखवून देऊ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर