शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील-हर्षवर्धन सदगीर यांच्यातील कुस्ती बरोबरीत, तीन लाखांच होतं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:31 IST

अमर पाटील कळंबा : कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

अमर पाटील

कळंबा : कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. काल, मंगळवारी कळंबा तलाव परिसरात आयोजित प्रथम क्रमांकाची तीन लाखांची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. कुस्ती बराचवेळ चालल्याने अखेर बरोबरीत सोडवण्यात आली. प्रथम क्रमांकाची दोन लाखांची कुस्ती हसन पटेल उपमहाराष्ट्र केसरी पुणे विरुद्ध सोनूकुमार पंजाब केसरी यांच्यात झाली. ज्यात हसडा डावावर हसन पटेल विजयी झाला. एक लाखाची द्वितीय क्रमांकाची कुस्ती श्रीमंत भोसले इचलकरंजी विरुद्ध उदयराज पाटील मोतीबाग बरोबरीत सोडवण्यात आली. तृतीय क्रमांकासाठी एकावन्न हजारांच्या दोन कुस्त्या पार पडल्या ज्यात प्रवीण पाटील कुंभी विरुद्ध सुभाष निउंगरे मोतीबाग कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली तर पृथ्वीराज पाटीलने पार्थ कळंत्रेचा पराभव केला. चौथ्या क्रमांकासाठी एकतीस हजारांच्या कुस्तीत प्रतीक म्हेतरने विनायक वासकरचा तर आदित्य सुतारने किशोर धनगरला चितपट करत विजय मिळवला. एकवीस हजाराच्या कुस्तीत तेजस मोरेने सुदर्शन पाटीलला चितपट केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आले. यावेळी आयोजित दीडशे लहानमोठ्या चटकदार कुस्त्यांनी प्रेक्षकांचे पारणे फेडले. उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, तानाजी पाटील, प्रकाश पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. राजाराम चौगुले यांच्या निवेदनाने तर रोहन भोसले यांच्या हलगी वादनाने कुस्तीची रंगत वाढवली. स्पर्धेचे नेटके आयोजन श्री महालक्ष्मी तालीम मंडळ, राम तालीम मंडळ, श्री हनुमान तालीम मंडळ संग्राम चौगुले, अमोल पाटील, सोमनाथ शिंदे विशाल तिवले यांनी केले होते. माजी सरपंच सागर भोगम, संतोष लोहार अरुण टोपकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्ती