शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, कमला कॉलेजची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 18:21 IST

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील म.न.पा.स्तर शालेय स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूलने न्यू कॉलेजचा, तर मुलींमध्ये कमला कॉलेजने छत्रपती शाहू विद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

ठळक मुद्देएकोणीस वर्षाखालील म.न.पा. शालेय फुटबॉल स्पर्धामहाराष्ट्र हायस्कूल, कमला कॉलेजची बाजी

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील म.न.पा.स्तर शालेय स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूलने न्यू कॉलेजचा, तर मुलींमध्ये कमला कॉलेजने छत्रपती शाहू विद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.संभाजीनगर येथील क्रीडासंकुलात शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने न्यू कॉलेजचा ३-० असा पराभव केला. ‘महाराष्ट्र’कडून कुणाल चव्हाण, सार्थक राऊत, प्रणव घाटगे यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद करीत विजय सुकर केला.

विजयी संघात मयूरेश चौगले, ऋतुराज सूर्यवंशी, सिद्धेश देसाई, प्रथमेश पाटील, विनायक चौगुले, कुणाल चव्हाण, आर्यवीर सरनोबत, प्रणव घाटगे, प्रणव कणसे, ओंकार बेळगुतकर, दिग्विजय आसणेकर, सार्थक राऊत, सुमित पाटील, अनिकेत पाटील, अमन शेख, करण पाटील यांचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पवार, सूर्यदीप माने, शरद मेढे, अभिजित गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

कोल्हापुरातील विभागीय क्रीडासंकुल येथे झालेल्या म.न.पा.स्तर १९ वर्षांखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत विजयी झालेल्या महाराष्ट्र हायस्कूलच्या संघासोबत मान्यवर उपस्थित होते. 

मुलींमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कमला कॉलेजने छत्रपती शाहू विद्यालयाचा १-० असा निसटता पराभव करीत विजेतेपद पटकाविले. हा विजयी गोल ‘कमला’कडून साक्षी सरनाईक हिने नोंदविला. विजयी संघात निकीता जाधव, वैष्णवी सुतार, शिवानी फडतारे, स्वाती रजपूत, प्रज्ञा नारे, राजलक्ष्मी सोलणकर, नाजनीन नायकवडी, ज्ञानेश्वरी ठोंबरे, अवंतिका कटकोळ, प्रतीक्षा रामाणे, कोमल कांबळे, प्रिया कणबरकर, आकांक्षा लाखे, इशा शिंगे, प्रशिक्षक रघू पाटील यांचा समावेश होता.विजेत्या संघास शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. अमर सासने, सचिन पांडव, प्रदीप साळोखे, सुनील पोवार, गौरव माने, योगेश हिरेमठ, श्रेयस मोरे, पंकज राऊत, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर