शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सीमाभागातील ८४५ गावांसाठी महाराष्ट्र सरकार पॅकेज देणार, मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती

By समीर देशपांडे | Updated: December 3, 2022 20:12 IST

संघर्ष टाळण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न 

कोल्हापूर : कर्नाटकमध्ये असणाऱ्या ८४५ मराठी भाषिक गावांसाठी महाराष्ट्र सरकारकडून पॅकेज देण्याची तयारी असून यासाठी मुंबईत बैठका सुरू आहेत. मला आशा आहे की लवकरच याबाबत निर्णय होवू शकतो अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सीमाप्रश्नाचे समन्वयक चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे. मी आणि शंभूराज देसाई यांनी कालच शासनाच्या वकिलांशी व्हीसीवरून एक तास चर्चा केली आहे. त्याला लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली आहे. केवळ बोलून हा प्रश्न सुटणारच नाही. तेथील मराठी शाळांसाठी निधी देता येईल का यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. मराठीमध्ये सातबारा मिळावा, मैलाचे दगड मराठीतही असावे अशा आमच्या आग्रही मागण्या आहेत.बसवराज बोम्मई हे भाजपचे असले तरी ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री असल्याने ते लोकभावना पाहून जसे बोलतात तसे आम्हीही महाराष्ट्राच्या बाजुने बोलणारच आहोत. जत तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. जतच्या ४५ गावांचा पाणी प्रश्न त्यामुळे मिटेल. दोन हजार कोटी रूपयांची योजना तांत्रिक मान्यतेशिवाय कशी मंजूर होईल असेही पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. उदयनराजे हे महाराज आहेत. ते जे काही बोलले आहेत त्यावर मी बोललेच पाहिजे असे नाही असेही ते यावेळी म्हणाले. हे होण्याची शक्यता

  • मराठीभाषिक कर्नाटकातील ८४५ गावांतील मराठी शाळांसाठी निधी
  • विद्यार्थ्यांची मराठी अधिक चांगली व्हावी यासाठी कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती
  • महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या संयुक्त प्रयत्नातून छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी उभारणे. 

कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आम्हाला कर्नाटकात येवू नका असे म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आणि मुख्य सचिवांशी मी बोलणार आहे. पत्रही लिहणार आहे. संघर्ष टाळण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे. 

जे शेड्यूल ट्राईबला ते धनगर समाजालाज्या पध्दतीने आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इतर मागास समाजाला मिळणाऱ्या सर्व सोयी, सुविधा मराठा समाजाला देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही घेतला होता. त्याच पध्दतीने धनगर आरक्षण मार्गी लागत नाही तोपर्यंत जे शेड्यूल ट्राईबवाल्यांना मिळते तेच धनगर समाजाला मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकchandrakant patilचंद्रकांत पाटील