शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सीमावासीयांना मंत्र्यांनी घातली भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 04:48 IST

१ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस सीमाभागात ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. यंदा महाराष्ट्रातील मंत्रीही काळ्या फिती लावून हा दिवस पाळणार आहेत. रविवारी हा दिवस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमावासीयांच्या भावना तीव्र आहेत.

कोल्हापूर - तुम्ही सीमावासीयांनी मोठी झळ सोसली केली आहे. तुमचे बलिदान, त्याग, धाडस याचे खूप मोठे उपकाराचे ओझे महाराष्ट्राच्या मनावर आहे. त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न आम्ही सीमालढ्यातील छोटे शिपाई या नात्याने राजकीय जीवनाचे प्रतिनिधी म्हणून करत आहोत. सीमाभाग महाराष्ट्रात येईल तेव्हाच कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल, हा ऐतिहासिक क्षण येईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी भावनिक साद सीमाभाग समन्वय मंत्री छगन भुजबळएकनाथ शिंदे यांनी सीमाभागातील जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रातून घातली आहे.१ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस सीमाभागात ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. यंदा महाराष्ट्रातील मंत्रीही काळ्या फिती लावून हा दिवस पाळणार आहेत. रविवारी हा दिवस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमावासीयांच्या भावना तीव्र आहेत. या भागातील सांस्कृतिक संस्था, वाचनालये यांनाही मदत दिली जात आहे. त्याची जाण असलेल्या महाराष्ट्र सरकारने या दिवशी सीमावासीयांच्या जखमेवर पत्राद्वारे फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या सीमाभाग समन्वय समितीने हे पत्र पाठविले आहे. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ व शिवसेनेचे एकनाथ शिंदे या दोन मंत्र्यांचा समावेश असलेल्या समितीने पाठविलेल्या पत्रात सीमाभागातील जनतेसाठी सुरू असलेली कामे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्याकडून सुरू असलेला पाठपुरावा यांनाही पत्राद्वारे उजाळा दिला आहे. 

सीमाकक्ष नव्याने केला कार्यान्वितशासनाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता युद्धपातळीवर सुरू आहे. सीमाकक्ष नव्याने जोमाने कार्यान्वित केला आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, मराठी भाषा या विभागांशी समन्वय साधून ८३५ खेड्यांसाठी निर्णयांचे एकत्रिकरण सुरू आहे. जनता ही महाराष्ट्राचीच आहे, राज्यातील सवलती सीमाभागातील जनतेलाही उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChhagan Bhujbalछगन भुजबळ