शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

महाराष्ट्र फौंडेशनचे पुरस्कार जाहीर

By admin | Updated: December 17, 2014 00:16 IST

पुण्यात होणार वितरण : किरण गुरव, हिंमाशू स्मार्त, श्याम मनोहर, पुष्पा भावे मानकरी

कोल्हापूर/ सातारा : अमेरिकास्थित महाराष्ट्र फौंडेशनचे ‘साहित्य’ आणि ‘समाजकार्य’ पुरस्कार जाहीर झाले असून, ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार पुणे येथील श्याम मनोहर, तर ‘समाजकार्य’ पुरस्कार मुंबई येथील पुष्पा भावे यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसमवेत अन्य पुरस्कारांचीही घोषणा झाली असून, याचे वितरण १० जानेवारी २०१५ रोजी पुणे येथील बालगंधर्व मंदिरात होणार आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी मंगळवारी सातारा येथे व ‘साधना’चे सहयोगी संपादक प्रा. राजा शिरगुप्पे यांनी आजरा येथे या पुरस्काराची घोषणा केली. हे पुरस्कार अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी व्यक्तींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फौंडेशनतर्फे देण्यात येत असले, तरी त्याचे संयोजन पुणे येथील साधना ट्रस्ट करते. साहित्य पुरस्कारामध्ये ‘विशेष ग्रंथ पुरस्कार’ गोव्याच्या महाबळेश्वर सैल यांना ‘तांडव’ कादंबरीसाठी, ‘अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार’ मुंबईच्या अरुण खोपकर यांना ‘चित्रव्यूह’ व ‘चलत् चित्रव्यूह’ या जोड पुस्तकांसाठी, ‘ललित ग्रंथ पुरस्कार’ कोल्हापूरच्या किरण गुरव यांच्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या पुस्तकासाठी, तर ‘रा. शं. दातार नाट्यपुरस्कार’ कोल्हापूरच्याच हिमांशू स्मार्त यांना ‘जत्रेतलं जायंट व्हील’ या नाट्यलेखनासाठी जाहीर झाला आहे. या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे आहे. समाजकार्य पुरस्कार पाचजणांना जाहीर झाला आहे.‘सामाजिक प्रश्न’ विभागात देण्यात येणारा कार्यकर्ता पुरस्कार बिंदुमाधव खिरे (पुणे), तर ‘असंघटित कष्टकरी’ या विभागातील कार्यकर्ता पुरस्कार मनीषा तोकले (बीड) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५० हजार आणि स्मृतिचिन्ह असे आहे. (प्रतिनिधी) वागळेंना डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्कार डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ निखिल वागळे (मुबंई) यांना जाहीर झाला असून, त्याचे स्वरूप एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आहे. ‘प्रबोधन’ विभागात देण्यात येणारा कार्यकर्ता पुरस्कार रमेश गावस (गोवा) यांना जाहीर झालेला आहे.हा पुरस्कार मला मिळाला यापेक्षा कथा या प्रकाराला मिळाला, या गोष्टीचा जास्त आनंद आहे़ राधानगरीसारख्या दुर्गम भागातील कष्टकऱ्यांच्या बोलीभाषेचा आधार असलेल्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या कथासंग्रहाला मिळालेला पुरस्कार कथा लेखकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आहे़ - किरण गुरव नाटकाच्या माध्यमातून भविष्यातील समस्यांचा वेध घेण्याचा माझा प्रयत्न असतो़ ‘जत्रेतलं जायंट व्हील’मध्येही आधुनिक जीवनात भान हरपलेल्या आणि एकमेकांशिवाय जगू पाहणाऱ्या दाम्पत्याच्या माध्यमातून जीवनशैलीवर प्रकाश टाकला आहे. या पुरस्कारामुळे या प्रयत्नाला दाद मिळाल्याचा आनंद विलक्षण आहे़नाटकाच्या माध्यमातून भविष्यातील समस्यांचा वेध घेण्याचा माझा प्रयत्न असतो़ ‘जत्रेतलं जायंट व्हील’मध्येही आधुनिक जीवनात भान हरपलेल्या आणि एकमेकांशिवाय जगू पाहणाऱ्या दाम्पत्याच्या माध्यमातून जीवनशैलीवर प्रकाश टाकला आहे. या पुरस्कारामुळे या प्रयत्नाला दाद मिळाल्याचा आनंद विलक्षण आहे़-हिमांशू स्मार्त