शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 04:15 IST

‘कोल्हापूर उत्तर’मधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते.

कोल्हापूर : ‘शरद पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही. चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो, हे समजतही नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

‘कोल्हापूर उत्तर’मधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी पवारांवर सडकून टीका करीत बंडखोरांनाही इशारा दिला. पाटील यांनी कोथरूडच्या प्रचारातून वेळ काढून कोल्हापूर येथे तीन आणि इचलकरंजीमध्ये सभा घेतल्या.

पाटील म्हणाले, पवार यांना वाटले की, मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवता येईल; पण तसे होणार नाही, असे सांगून पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये युतीधर्म पाळावाच लागेल, असे निक्षून सांगितले. मी निवडणूक युद्ध म्हणूनच लढतो. त्यामुळे कोथरूडमध्ये शेवटचे मत पडेपर्यंत मी थांबणार आहे. उच्चांकी मतदार घेऊन दाखवू. एकीकडे ‘पवार यांचं वय झालंय,’ असे सुशीलकुमार शिंदे सांगत आहेत. दुसरीकडे, मरणप्राय झालेल्या कॉँग्रेसमध्ये आता प्राणवायू फुंकू नका असेही पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी महिला आणि ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये बूथप्रमुखांच्या मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे आणि कॉँग्रेसच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले दौलत देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काटे यांच्या जाण्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महिनाभराच्या अंतरात दुसरा मोठा धक्का बसला आहे....तर बायकोच्या विरोधातही प्रचार!विरोधी पक्षातून माझी बायको जरी उभारली तरी तिचा प्रचार माझ्याकडून होणार नाही. सकाळी एकत्र चहा घेऊन बाहेर पडू; पण नंतर मात्र दिवसभरात काय झाले याची विचारणाही तिच्याकडे करणार नाही, अशा शब्दांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना डोस दिला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवार