शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष निष्ठाच गुंडाळण्याचा ट्रेड; कपडे बदलण्याइतक्या सहजपणे नेते, कार्यकर्त्यांचे पक्षांतर

By भीमगोंड देसाई | Updated: November 1, 2024 15:44 IST

कायम सत्ता, लाभाचा अतीव मोह, खोबरे मिळेल तिकडे चांगभले

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यासह राज्यात कपडे बदलावे इतक्या सहजपणे राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते पक्षांतर करीत आहेत. कायम सत्तेत आणि लाभ मिळत राहण्याच्या अतीव मोहामुळे ते खाेबरे मिळेल तिकडे चांगभले करीत आहेत. पक्षनिष्ठाच गुंडाळून ठेवून संधिसाधूपणा फोफावला आहे. नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांची यामध्ये चंगळ होत असल्याने वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षात काम करणाऱ्यांच्या वाट्याला खळ, पोस्टर, जाझम, खुर्च्या उचलणेच येत आहे. यामुळे नव्याने राजकारणात येण्याचा विचार करीत असलेले तरूण, तरूणींमध्ये नकारात्मकता अधिक गडद होताना दिसत आहे.शिवसेना, राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर आमदार उघडपणे फुटून गेले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत फुटून जाण्याच्या प्रवृत्तीला मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. तरीही आताच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय करिअर स्थिरस्थावर असलेलेही तिकीट मिळाले नाही, खोके पोहोच झाले, भविष्यात लाभाचे आश्वासन मिळाल्यानंतर मूळ पक्ष सोडून जात आहेत. विशेष म्हणजे विरूध्द आणि टोकाची भिन्नता असलेल्या विचारसरणीच्या पक्षात जाऊन निवडणूक रिंगणात आहेत. यावरून मी म्हणजेच पक्ष, मतदारांनी माझ्या मागेच फरपटत आले पाहिजे, मी सांगेल त्याप्रमाणेच करावे, अशी त्यांची छुपी भूमिकाही यानिमित्ताने उघड झाली आहे.

दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पोवार, शेकापचे बाबुराव कदम यासह काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे उभे आयुष्य गेले. वर्षानुवर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता ते काम करीत आहेत. प्रत्येक निवडणुकीत विविध आलेल्या ऑफर्स धुडकावून ते पक्षनिष्ठेशी एकनिष्ठ राहणे पसंत केले. सध्याचे चित्र याउलट आहे. उमेदवारी देताना निवडून येण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यात ताकदवान असणाऱ्यांचा विचार प्राधान्याने होत आहे. यामुळेच निष्ठेचाच सौदा सुरू आहे.

राजकारणात धंदेवाईकांचा भरणाधंदेवाईकांचा राजकारणात अधिक भरणा झाल्याने राजकारणाचा धंदा आणि व्यवसाय झाला आहे. केवळ मते मिळण्यासाठी मी समाजसेवक आहे, अशा फुशारक्या मारल्या जातात. प्रत्यक्षात व्यवहार उलटा असतो. विचारांचा व्यवहार सोडून व्यवहारांचा विचार वाढल्याने ज्या पक्षाने आमदार, खासदार, मंत्री केले तेही सहजपणे संधिसाधू भूमिका घेत आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024