शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजीत मतदान केंद्रांवर गवा, चांद्रयानच्या प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 18:11 IST

इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानासाठी आकृष्ट करण्याबरोबर निवडणूक विभागाने चौदा मतदान केंद्रांवर विविध प्रतिकृती, रांगोळी आणि माहितीफलक लावण्याचा ...

इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानासाठी आकृष्ट करण्याबरोबर निवडणूक विभागाने चौदा मतदान केंद्रांवर विविध प्रतिकृती, रांगोळी आणि माहितीफलक लावण्याचा अनोखा उपक्रम इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात राबविला.मतांचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. हे करत असतानाच शहरातील काही मतदान केंद्रांवर थीमनुसार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. व्यंकटराव हायस्कूलमध्ये चांद्रयान प्रक्षेपणाची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. याद्वारे भारत चांद्रयान मोहिमेमध्ये अग्रेसर असल्याचे दाखविण्यात आले आहे; तर शहापूर हायस्कूलमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी गव्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.इचलकरंजी शहराला १२५ वर्षांचा यंत्रमाग व्यवसायाचा इतिहास आहे. गंगामाई विद्यामंदिरावर इचलकरंजी वस्त्रोद्योगाच्या पाऊलखुणा छायाचित्राच्या माध्यमातून दाखविण्यात आल्या आहेत. तसेच इतिहासही लिहिण्यात आला आहे. याबरोबरच शहरातील इतर केंद्रांवर पिंक, दिव्यांग, यूथ, मॉडेल पोलिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.तसेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, घनकचरा व्यवस्थापन, हरित शहर, प्लास्टिकचा पुनर्वापर, प्लास्टिक टाळा, पर्यावरण संवर्धन, आदी संदेश विविध छायाचित्रे व प्रतिकृतींच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. मतदानाला जाताना नागरिकांना या प्रतिकृती सहज नजरेला पडतील, अशा ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ichalkaranji-acइचलकरंजीVotingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024