शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Vidhan Sabha Election 2024: शब्दांचा संपला, आकड्यांचा खेळ सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:10 IST

पथकांची नजर हालचालींवर

कोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेला शब्दांचा जाहीर खेळ सोमवारी संध्याकाळी संपला आणि लगोलग आकड्यांचा खेळ सुरू झाला. कुठल्या भागात किती मते पडतील, अशा आकड्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू झाला आहे. दरम्यान, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख उमेदवारांनी दुचाकी रॅली आणि पदयात्रेने जाहीर प्रचाराची सांगता केली. जाहीर सभांच्या माध्यमातून एकमेकांचा पंचनामा करणाऱ्या नेत्यांची राखीव फौज आता छुप्या प्रचारात उतरली असून, ज्या भागात कमी मतांची शंका आहे, तेथील खड्डा भरण्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे.कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी एक हजार दुचाकीधारकांसोबत रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. तर कसबा बावडा येथे रॅलीचा समारोप केला. विरोधी उमेदवार राजेश लाटकर यांनी भागात पदयात्रा काढल्या. कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी सांगता सभा घेतल्या. मुश्रीफ यांच्या सभेसाठी खासदार धैर्यशील माने आणि अंबरीश घाटगे यांची उपस्थिती होती. तर घाटगे यांच्या सभेत शरद पवार यांच्या भगिनी आणि एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी चौफेर टीका केली.आमदार विनय कोरे यांनी जोतिबा येथे सभा घेत प्रचाराची सांगता केली. सत्यजित पाटील यांनी मलकापुरात पदयात्रा काढली. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची आलास येथे सांगता सभा झाली तर गणपतराव पाटील यांनी जयसिंगपूरमध्ये पदयात्रा काढली. स्वाभिमानीनेही जयसिंगपूरमध्ये जाहीर सभा घेतली. प्रकाश आबिटकर यांनी आजऱ्यात दुचाकी रॅली काढली तर के. पी. पाटील यांनी राशिवडेमध्ये पदयात्रा काढली. अन्य चंदगड, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, इचलकरंजी, करवीर मतदारसंघातील उमेदवारांनी मोठ्या गावांमध्ये पदयात्रा आणि दुचाकी रॅली काढून प्रचाराची सांगता केली.

कार्यकर्त्यांना मदतजाहीर प्रचार संपताच उमेदवार व त्यांच्या प्रमुख कारभाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांतील प्रचाराचा आढावा घेतला, कोठे कमी आहोत, कोणाला संपर्क करावा लागणार आहे याचा अंदाज घेऊन सोमवारी रात्रीनंतर जोडण्या सुरू झाल्या. मतदान केंद्रनिहाय लावल्या जाणाऱ्या बूथवरील कार्यकर्त्यांना साहित्य पाठविण्याचे नियोजन सुरू झाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही कार्यकर्ते मतदारसंघात रात्री अपरात्री फिरत असून उमेदवारांचे निरोप पोहोचवीत आहेत.

पास वाटपनिवडणुकीच्या धावपळीत प्रचार करून थकलेल्या कार्यकर्त्यांचे श्रमपरिहार होत आहेत. काही मतदारांपर्यंत जेवणाचे पास वाटले जात आहेत. त्यामुळे हॉटेल्स, धाबे, कार्यालयातील जेवणावळीची गर्दी झालेले चित्र आहे. हॉटेल, धाब्यावरील गर्दी दिसत असली तरी ते कोणाकडून आले आहेत हे स्पष्ट होत नसल्याने यंत्रणेचाही नाइलाज होत आहे. परंतु रात्री साडेदहा वाजता सर्व व्यवहार बंद केले जात आहेत.पथकांची नजर हालचालींवरनिवडणुकीसाठी नेमलेली सरकारी यंत्रणा आता सज्ज झाली आहे. गस्ती पथकांची करडी नजर रात्रीच्या हालचालीवर आहे. ही पथके सोमवारपासून अधिक दक्ष झाली आहेत. या पथकांना काही फोन येत असल्याने त्यांचीही धावपळ होत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024