शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 09:58 IST

Maharashtra Assembly Election 2024 : व्यवस्था करतो ही महाडिक यांची कसली भाषा आहे असा संतप्त सवाल काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला. 

Maharashtra Assembly Election 2024 : उजळाईवाडी : लाडकी बहिणीचे पैसे घेतले आणि काँग्रेसच्या प्रचाराला गेल्यास त्या महिलांचे फोटो काढून आम्हाला द्या, त्यांची व्यवस्था करतो अशी भाषा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. व्यवस्था करतो ही महाडिक यांची कसली भाषा आहे असा संतप्त सवाल काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला. 

काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे शनिवारी (दि.९) झालेल्या दुर्गाशक्ती संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्या उजळाईवाडीतच शनिवारी झालेल्या सभेत खासदार महाडिक यांनी ज्या महिला आमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या प्रचाराला किंवा रॅलीला गेल्यास त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, त्यांची काय व्यवस्था करायची ते आम्ही बघतो असे वादग्रस्त विधान केले. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्याची दखल खासदार प्रणिती शिंदे यांनीही घेतली. त्या म्हणाल्या, भाजपच्या काळात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली. चिमुरड्या मुलींवर अत्याचार होत आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना भाजप पाठीशी घालत आहे. 

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे मतदारसंघातील महिला भगिनींसाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले. महिलांचे आशीर्वाद आणि पाठबळ माझ्या विजयात महत्त्वाचे ठरेल. सरपंच उत्तम आंबवडेकर म्हणाले, महिला संवाद मेळाव्याला झालेली गर्दी आमदार ऋतुराज पाटील यांच्या विजयाची नांदी आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा बैंक संचालक स्मिता गवळी, अश्विनी शिरगावे, शैलजा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. 

विजयाची साक्ष आजपर्यंतच्या कारकिर्दीत महिलांची एवढी गर्दी पहिल्यांदाच पाहिली. ही गर्दी आमदार पाटील यांच्या विजयाची साक्ष देत आहे. ऋतुराज यांच्यासारखा कार्यक्षम तरुण आमदार आपल्याला लाभला आहे. विधानसभेच्या लॉबीमध्येही कर्मचाऱ्याऱ्यांची विचारपूस करणारा हा एकमेव आमदार असल्याचे कौतुकोद्गार प्रणिती शिंदे यांनी काढले.

लाव रे तो व्हिडीओ...खासदार प्रणिती शिंदे यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत खासदार धनंजय महाडिक यांचा व्हिडीओ स्क्रीनवर लावण्यास सांगितला. व्हिडीओ पूर्ण होताच त्यांनी धनंजय महाडिक यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Praniti Shindeप्रणिती शिंदेDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणRuturaj Patilऋतुराज पाटील