शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्यनिर्मितीत महाराणी ताराराणींचे योगदान मोलाचे - शाहू छत्रपती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:48 IST

'महाराणी ताराराणी या महिलेने राज्य स्थापन करून ते चालवणे ही जगातील एकमेव घटना असेल'

कोल्हापूर : मोगल साम्राज्याशी संघर्ष करीत महाराणी ताराराणी यांनी महाराष्ट्रात स्वराज्यनिर्मिती करण्यात मोलाचे योगदान दिले, असे मत बुधवारी खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा येथील मेजर स्वाती संतोष महाडिक यांना मान्यवरांच्या हस्ते महाराणी ताराराणी पुरस्कार देण्यात आला.हा कार्यक्रम शाहू स्मारक भवनात झाला.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज यांच्यानंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष केला. मोगल साम्राज्य परतवून लावले. औरंगजेब यांच्या सैनिकांशी लढाया करून त्या जिंकल्या. त्या काळी विरोधकांकडून अनेक ऑफर दाखवल्या जात होत्या. मात्र त्यांनी त्या धुडकावून लावल्या.संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यासारख्या अनेक मावळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्यनिर्मितीसाठी कर्तबगारी गाजवली. त्यांची प्रेरणा मेजर स्वाती महाडिक यांनी घेतली. पती संतोष महाडिक यांना वीरमरण आल्यानंतर खचून न जाता मोठ्या जिद्दीने हातात बंदूक घेऊन त्या देशसेवेत रुजू झाल्या, हे कौतुकास्पद आहे.मेजर स्वाती महाडिक म्हणाल्या, पती कर्नल संतोष महाडिक यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्या क्षणी आयुष्य संपल्यासारखे वाटले; पण माझ्या पतींनी आयुष्यभर जे शिकवले, ते माझ्या मनात घर करून होते. म्हणून मीही देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. पतीच्या वीरमरणाच्या दु़:खातून सावरत, महाराणी ताराराणी यांची प्रेरणा घेत मी लष्करात दाखल झाले.कर्नल अमरसिंह सावंत यांचे भाषण झाले. कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, मेजर जनरल एम. एन. काशीद, कर्नल विक्रम नलावडे, शिवाजीराव परुळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सी. एम. गायकवाड, विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शैलजा भोसले यांनी आभार मानले.जगातील एकमेव घटनाइतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ‘महाराणी ताराबाई - एक अभ्यास’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी महाराणी ताराराणी या महिलेने राज्य स्थापन करून ते चालवणे ही जगातील एकमेव घटना असेल, असे मत मांडले. यामुळे महिला सबलीकरणासाठी त्यांचे चरित्र खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharani Tararani's contribution to Swarajya invaluable: Shahu Chhatrapati

Web Summary : Shahu Chhatrapati praised Maharani Tararani's role in establishing Swarajya by fighting the Mughals. Major Swati Mahadik received the Maharani Tararani Award for her service. Tararani's courage and leadership inspires women empowerment, historian Indrajit Sawant said.