शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात जैन मठात २८ फुटी नयनमनोहर १००८ आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न

By संदीप आडनाईक | Updated: May 10, 2024 18:52 IST

तीस मुंनिंसह लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य, प्रणामसागर, विशुद्धसागर महाराजांची उपस्थिती

कोल्हापूर : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवारी शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठातील भगवान १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात आला. या ६३ व्या वार्षिक पूजा महोत्सव सोहळ्याला परमपूज्य स्वामी लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य, ज्योतिषाचार्य परमपूज्य प्रणामसागर महाराज आणि चर्याशिरोमणी अध्यात्म योगी परमपूज्य १०८ श्री विशुद्धसागर महाराज ससंघ (२९ पिंचि) यांच्यासह ३० महामुनींचा संघ उपस्थित होता. केसापुर जैन मंदिराच्या महामस्तकाभिषेक समितीने या पूजेचे यशस्वी नियोजन केले. मांगलिक कार्यक्रमांना सकाळपासून सुरुवात झाली. सकाळी ६.०० वाजता मंगल वाद्यघोष, ध्वजारोहण, ८.३० वाजता भगवान चंद्रप्रभ तीर्थंकर अभिषेक, श्री ज्वालामालिनी देवी अभिषेक आणि षोडशोपचार पुजा,  दुपारी २.०० वाजता आचार्यश्रींचे प्रवचन झाले. या सोहळ्यात भरतेश शांतीनाथ सांगरुळकर आणि कारभारी धनंजय भूपाल मगदूम या दाम्पत्याचा आदर्श दाम्पत्य म्हणून सत्कार करण्यात आला. सायंकाळी ४.०० वाजता सुरू झालेल्या या भगवान आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता सूर्यास्ताला झाली. यामध्ये पंचामृत, प्रथम कलश, नारळपाणी, इक्षुरस, आमरस, दुग्धाभिषेक, सर्वोषधि, कल्कचूर्ण, कषायचूर्ण, श्वेतचंदन, रक्तचंदन, हळद, कुंकू, अष्टगंध, पूर्ण सुगंधित कलाभिषेक असे परंपरेनुसार शांतीधारा, ईशान्य, आग्नेय वायव्य, नैऋत्य असे चतुषकोन कलशाने अभिषेक करण्यात आले. मंगल आरती, पुष्पवृष्टी आणि रत्नवृष्टीने या सोहळ्याची सांगता झाली.यावेळी सुरेश मगदूम, नेमिनाथ कापसे, संजय आडके, संजय कापसे, संजय कोठावळे, अशोक रोटे, अनघा सांगरुळकर, ज्योती शेट्टी, पद्मा घोडके, रूपाली पत्रावळे, संमती हंजे, राजेश उपाध्ये यांच्यासह महा मस्तकाभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक,  तमिळनाडू राज्यातून कोल्हापूरसह सांगली, सातारा , रायबाग, बेळगाव, जिनकंची या मठातून सुमारे तीन हजार जैन श्रावक आणि श्राविका उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर