शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

महाकालीचा ‘कौल’ फुलेवाडीला

By admin | Updated: March 9, 2015 23:46 IST

टायब्रेकरमध्ये ‘पीटीएम’वर मात : निखिल खाडे याला ‘मालिकावीर’चा बहुमान

कोल्हापूर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात फुलेवाडी क्रीडा मंडळाने पाटाकडील तालीम मंडळ(अ)चा ४-३ असा टायब्रेकरवर पराभव करत महाकाली चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ म्हणून ‘फुलेवाडी’चा गोलरक्षक निखिल खाडे याची निवड करण्यात आली.शाहू स्टेडियम येथे सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही संघांतील खेळाडूंना अचूक फिनिशिंग करता न आल्याने पूर्वार्धात गोल करता आले नाहीत. ‘पाटाकडील’कडून रूपेश सुर्वे, उत्सव मरळकर, हृषीकेश मेथे-पाटील, अक्षय मेथे-पाटील, अजिंक्य नलवडे यांनी गोल करण्यासाठी जंग-जंग पछाडले. मात्र, फुलेवाडी गोलरक्षक निखिल खाडे याने ‘उत्कृष्ट गोलरक्षण’ करत त्यांचे गोल करण्याचे इरादे फोल ठरविले. ‘फुलेवाडी’कडून मोहित मंडलिक, सूरज शिंगटे, तेजस जाधव, मोहसिन बागवान, रौनक कांबळे, अजित पोवार यांनी चांगला खेळ केला. ५५ व्या मिनिटास ‘फुलेवाडी’कडून मिळालेल्या संधीवर रौनक कांबळे याने गोलची नोंद करत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. एक गोलचे ओझे घेऊन खेळणाऱ्या पाटाकडील संघाने खेळात बदल करत आक्रमक व वेगवान चाली रचण्यास सुरुवात केली. त्यात तीन मिनिटांत फुलेवाडी विरुद्ध पाच कॉर्नर किक पाटाकडील संघास मिळाल्या. गोल होणार असे वाटत असतानाच फुलेवाडी गोलरक्षक निखिल खाडेने किमान सहा फटके अत्यंत चपळाईने झेपावत गोलपोस्ट बाहेर काढले. ६३ व्या मिनिटास ‘पाटाकडील’कडून अक्षय मेथे-पाटीलने उजव्या बगलेतून दिलेल्या पासवर प्रशांत नार्वेकर याने अचूक गोल करत १-१ अशी बरोबरी केली. सामन्यात बरोबरी झाल्यानंतर ‘पाटाकडील’ने खेळात अत्यंत आक्रमकपणा आणला. मात्र, प्रत्येक चढाई फुलेवाडी गोलरक्षक निखिल खाडे याने तितक्याच चपळाईने निष्प्रभ ठरविल्या. संपूर्ण वेळेत १-१ अशी बरोबरी राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय पंचांनी घेतला. त्यात फुलेवाडी संघाने ४-३ असा ‘पाटाकडील’चा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ‘पाटाकडील’कडून सैफ हकिम, अक्षय मेथे पाटील, नियाज पटेल यांनी, तर ‘फुलेवाडी’कडून रोहित साठे, तेजस जाधव, अजित पोवार, निखिल खाडे यांनी गोल केले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ छत्रपती मधुरिमाराजे, विशाल सावंत यांच्या हस्ते झाला. यावेळी विकास साळोखे, संभाजी जाधव, शिवाजी पाटील, माणिक मंडलिक, बबनराव कोराणे, अजित खराडे, विजय साळोखे आदी उपस्थित होते.