शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

पाकिटामुळेच देसार्इंकडून महाडिकांचा जयजयकार

By admin | Updated: January 26, 2017 00:55 IST

सतेज समर्थकांची टीका : नको त्यांचा लाळघोटेपणा करू नका

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे लोणी व जाडजूड पाकिटामुळेच भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जयजयकार करत असल्याचा पलटवार बुधवारी आमदार सतेज पाटील यांचे समर्थक नगरसेवक उपमहापौर अर्जुन माने व प्रवीण केसरकर यांनी पत्रकाद्वारे केला. देसाई यांनी पाच झेंडे लावून निवडून येणाऱ्यांनी नीतीमत्ता शिकवू नये, अशी टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर दिले आहे.पत्रकात म्हटले आहे, ‘देसाई अनेक वर्षे भाजपमध्ये आहेत, परंतु ‘गोकुळ’चे स्वीकृत संचालकपद मिळताच त्यांची नीतीमत्ता गळून पडली. ‘गोकुळ’चे लोणी व जाडजुड पाकिटामुळेच त्यांनी महाडिकांची तळी उचलण्याचे काम सुरू केले आहे. सतेज पाटील यांनी भाजपने निष्ठावंतांना न्याय द्यावा, असे म्हटले होते. हा सल्ला बाबा देसार्इंच्या इतका जिव्हारी लागण्याचे कारण काय..? महाडिकांचा इतिहास बाबांना नक्कीच माहीत असावा. युती शासनाच्या काळात शिवसेनेच्या मंत्र्यांचा गोंडा घोळणारे, नाफ्ता भेसळ प्रकरणातून सुटण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पुढे-मागे करणारे, खासदारकी मिळविण्यासाठी हसन मुश्रीफ यांचे उंबरे झिजवणारे महाडिक ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ प्रवृत्तीचे आहेत. महाडिकांनी कुणाला टांग मारली नाही, असा नेता जिल्ह्यात शोधून सापडणार नाही. देसाई यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीने भाजपबद्दल बोलणे समजू शकतो; पण महाडिक प्रवृत्तीचे ढोल तेसुद्धा बडवत आहेत. करवीरमध्ये स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करण्यासाठी महाडिकांनी जंग-जंग पछाडले परंतु जनतेने त्यांना ४६ हजार मतांनी पराभूत केले. खानविलकर यांना पराभूत करण्यासाठी महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली पण सतेज यांनी काम केल्यानेच जनतेने त्यांना आमदार केले. त्याचे श्रेय महाडिकांना देण्याचा ‘लाळघोटेपणा’ बाबांनी करू नये.संपतबापूंना दोनदा मदतगेल्या विधानसभेला काँग्रेस नेत्यांचा झालेला पराभव या नेत्यांनी जनमताचा आदर करत स्वीकारला. त्यामध्ये कोण कुणाला दोष देत बसलेले नाही; परंतु लोकसभेला संभाजीराजेंचा घात करणारे व संपतबापूंना दोनदा आमदार करण्यासाठी छुपी चाल खेळणारे महाडिकच होते, हे बाबा देसाई यांनी विसरू नये, असाही टोला पत्रकात लगावला.