शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वडगाव बाजार समितीत समझोता एक्स्प्रेस सुसाट, सर्व जागा जिंकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 19:55 IST

सोसायटी गटातील ११ जागेवर विजयी संपादन करण्यास माजी आमदार महादेवराव महाडिक,आमदार डॉ. विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांच्या राजर्षी शाहू आघाडीस यश आले आहे

पेठवडगाव/सुहास जाधव बहुचर्चित वडगाव बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा महाडिक, कोरे,आवाडे यांच्या राजर्षी शाहू आघाडीने निर्विवाद सत्ता हस्तगत केली.या आघाडीचे सर्वच्या सर्व १८ जागेवर विजय संपादन केला.तर बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नेमणूकी पासून एकत्र आलेल्या महाविकास आघाडीने झुंज दिली.तालुका कार्यक्षेत्र असलेल्या वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची अटीतटीची निवडणूक झाली. बाजार समितीसाठी मंगळवारी ८० टक्के मतदान झाले होते. आज  महालक्ष्मी मंगलधाम येथे निवडणुक निर्णय अधिकारी डाॅ.प्रगती बागल, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मक्सुद शिंदी यांच्या मार्गदर्शना खाली सकाळी दहा टेबल वर मतमोजणीस सुरवात झाली.

मतमोजणीमध्ये पहिल्यांदा कृषी ,पंतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी गटातील अकरा जागेसाठी मतमोजणीस सुरवात झाली.यामध्ये वडगाव, हातकणंगले,इचलकरंजी केंद्रांवरील १४९० मताची मोजणी करण्यात आली.यातील उमेदवार हे सरासरी तीनशे पेक्षा जास्त मताने विजयी झाले.तसे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या समर्थकांनी गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.विशेष म्हणजे या आघाडीस पुर्ण बहुमत मिळाले.त्यानंतर मतमोजणीची औपचारिकता राहिली.राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे विजयी उमेदवार असे : विकास सेवा        

संस्था गट - किरण जयसिंगराव इंगवले (९०६),विलास बाबासाहेब  खानविलकर(८९४)  , सुरेश तात्यासो पाटील (८८५),जगोंडा लक्ष्मण पाटील (८८२),शिवाजी पांडुरंग पाटील(८७९), आण्णासो बंडू डिग्रजे(८६५) , बाळकृष्ण गणपती बोराडे(८५६),भारती रावसो चौगुले(८९४),वैशाली राजेंद्र नरंदेकर (८६२),चाॅद बाबालाल मुजावर (८८२),धुळगोंडा आण्णासो डावरे(८६७), 

ग्रामपंचायत गट :  राजू मगदूम (४१०),सुनिता मनोहर चव्हाण (४०२),नितीन पांडुरंग कांबळे(४११),वसंतराव शामराव खोत(४२७), 

 अडते व्यापारी गट :  सागर सुनिल मुसळे(६६२),संजय बाबूराव वठारे(६६२), 

 हमाल व तोलाई गट : नितीन विष्णू चव्हाण (४३) 

महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार: 

विकास सेवा संस्था गट - गिरीश अरविंद इंगवले(५३८),श्रीकांत बापूसो चौगुले निकम(५२४),सुनील गणपती देशमुख (५२७),अर्जुन रंगराव पाटील (५११),उदय श्रीधर पाटील (५२३),सुहास महादेव पाटील (५०७),महादेव यशवंत भोसले(४८७), अपक्ष भुपाल विठू बाळाई(१७) यशोदा भगवान चौगुले(५३२),वैशाली शरद पाटील (५२६),सलिम बाबालाल महालदार (५७७),शिवाजी पांडुरंग वाघमोडे(५७८),अपक्ष भुपाल विठू बाळाई(११) 

 ग्रामपंचायत:  संभाजी शामराव पवार (३०५),सुकुमार बाळू चव्हाण (२९१),अपक्ष प्रताप उर्फ बंटी पाटील (७५),विश्वास दशरथ कुरणे(३१२), अपक्ष सुरेखा मनिषकुमार कांबळे(५९), पांडुरंग ज्ञानू पाटील (३५४), 

अडते व्यापारी गट : चंद्रकांत रामचंद्र तेली(५७८),राजेंद्र देवाप्पा मोकाशी (५६१), 

हमाल व तोलाई गट : सुखदेव भगवान माने(११) 

वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या २५ वर्षात शेतकरी केंद्रबिंदु मानून काम केले आहे. यागोष्टीवरच विश्वास ठेवुन शेतकरी- व्यापारी यांनी मतांच्या रुपात राजर्षी शाहू आघाडीस सत्ता दिली आहे.पुढील काळात शेतक-यांच्या मालाला चांगला भाव  व बाजार समितीचा चांगल्या पध्दतीने विकास साधून शेतक-यांना सोयीसुविधामिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. - माजी आमदार अमल महाडीक(सत्ताधारी राजर्षी शाहु शेतकरी विकास आघाडी)

 

तालुक्यातील सभासद मतदारांनी आम्हाला दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.तसेच महाआघाडीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी दिलेला लढा नक्कीच कौतुकास्पद असून कार्यकर्त्यानी निराश न होवू नये.वडगाव बाजार समितीचा विकास व समितीला गतवैभव हेच आपले उद्दिष्ट आहे.सत्ते आलो नसलो तरी वडगाव बाजार समितीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार - आमदार राजू आवळे ,महाआघाडी,पॅनेल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिकAmal Mahadikअमल महाडिकElectionनिवडणूक