शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक-फडणवीस भेटीची जिल्हाभर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:14 IST

राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने बुधवारी या भेटीची जिल्हाभर चर्चा सुरू होती. महाडिक समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी विविध प्रतिक्रिया जिल्हाभर उमटल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान याबाबतच्या हालचाली आणखी वेगावण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमहाडिक-फडणवीस भेटीची जिल्हाभर चर्चापावसाळी अधिवेशनादरम्यान चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने बुधवारी या भेटीची जिल्हाभर चर्चा सुरू होती. महाडिक समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी विविध प्रतिक्रिया जिल्हाभर उमटल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, पुढील महिन्यात होणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान याबाबतच्या हालचाली आणखी वेगावण्याची शक्यता आहे.गेले तीन दिवस महाडिक मुंबईत आहेत. मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनीच महाडिक यांना मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्याची सूचना केली आणि ‘वर्षा’ निवासस्थानीही तशी कल्पना दिली. यानंतर धनंजय महाडिक आणि फडणवीस यांची भेट झाली.या भेटीची बुधवारी दिवसभर जिल्ह्यात चर्चा सुरू होती. महाडिक हे त्यांच्या सोईचे राजकारण करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होतेय, असा सूर राष्ट्रवादीमधीलच त्यांच्या विरोधी नेते, कार्यकर्त्यांचा असून, याउलट महाडिक यांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी ‘एकदा भाजपमध्ये प्रवेश कराच’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मंगळवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी महाडिक यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर दुसरीकडे राष्ट्रवादीवाल्यांनीच पराभवाला हातभार लावल्याने तिथे राहून काय उपयोग? असा सवाल महाडिक समर्थक करत आहेत. 

 

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर