जयसिंगपूर : उच्चस्तरीय समितीने वीस दिवसांत वनतारा गुजरात येथे असलेल्या महादेवी हत्तिणीची आरोग्यस्थिती, तिचे सध्याचे वास्तव्य, तसेच पुनर्वसन केंद्रातील सुविधा व वैद्यकीय तपासणी करावी. नांदणी येथे माधुरीसाठी उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन केंद्राच्या सर्व आवश्यक परवानग्यांचा अहवाल तयार करून रेकॉर्डवर आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुजरात येथील वनतारा केंद्रात महादेवी हत्तिणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.वनतारा येथे उच्चस्तरीय पॅनल समिती, राज्य शासन, नांदणी मठ आणि वनतारा संस्थेच्या संयुक्त पाहणी करण्यात आली. यात समितीचे डॉ. एन.एस. मनोहरण, मठाचे डॉ. एस. कल्लाप्पा, पेटाचे डॉ. निनी अरविंदन, वनताराचे निरज संगवान, नांदणी मठाचे माहुत इस्माईल, डॉ. सागर पाटील, शिरीष हेरवाडे यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली. २२ ऑक्टोबर रोजी उच्चस्तरीय समितीसमोर सुनावणी झाली होती. यात हत्तिणीची वैद्यकीय तपासणी करून परवानगीसाठी वीस दिवसांची मुदत दिली होती. त्याप्रमाणे संयुक्त पथकाने गुजरात येथील वनतारा महादेवी हत्तिणीची वैद्यकीय तपासणी करून याचा अहवाल संयुक्त पथकाने समितीकडे सादर केला आहे. पुढील कार्यवाहीबाबतचा निर्णय २९ नोव्हेंबरच्या सुनावणीत होणार आहे.
Web Summary : A high-level committee inspected Mahadevi's health and facilities at Vantara, Gujarat. The joint team submitted a report following the medical examination. A decision regarding further action will be made on November 29th after review.
Web Summary : गुजरात के वनतारा में उच्च स्तरीय समिति ने महादेवी हथिनी के स्वास्थ्य और सुविधाओं का निरीक्षण किया। संयुक्त दल ने चिकित्सा परीक्षण के बाद एक रिपोर्ट प्रस्तुत की। आगे की कार्रवाई पर निर्णय 29 नवंबर को समीक्षा के बाद किया जाएगा।