शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
5
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
6
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
7
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
8
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
9
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
10
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
11
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
12
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
13
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
14
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
15
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
16
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
17
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
18
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
19
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
20
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी

हुपरीतील टोळीकडून आलिशान कार जप्त

By admin | Updated: July 10, 2016 01:41 IST

तीन गाड्या : आणखी कोणाकोणाला लुटल्याची चौकशी सुरू

कोल्हापूर : पुणे येथील शिवाजीनगर परिसरातील उद्योजक महिलेकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहायक फौजदारासह अन्य आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या तीन आलिशान कार शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जप्त केल्या. या दरोडेखोर टोळीने आणखी कोणाकोणाला लुटले आहे, यासंबंधी चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी दिनकर मोहिते यांनी सांगितले. हुपरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार संजय लोंढे, पोलिस कॉन्स्टेबल बाबूमियाँ काझी, त्यांचे साथीदार फैयाज शेख, जितेंद्रकुमार शर्मा, वसंत पाटील, आशिष मायगोंडा, सदानंद कांबळे यांनी पुण्यातील जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला व तिच्या मानलेल्या भावाला खाकी वर्दीचा धाक दाखवून पाच कोटींची खंडणी मागत ३१ लाख ५० हजार रुपये लुटले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या सर्वांना अटक केली. संजय लोंढे याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला उद्या, सोमवारी कागल येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. अन्य संशयित आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते चौकशी करीत आहेत. संजय लोंढे, वसंत पाटील व आशिष मायगोंडा यांच्या तीन आलिशान कार जप्त केल्या. लुटलेल्या पैशांसंबंधी चौकशी केली असता त्यांनी ते एकमेकांना वाटून घेतल्याचे सांगितले. या सर्वांच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली आहे. त्यांच्या बँक खात्यांची व मालमत्तेचीही पोलिस माहिती घेत आहेत. दिवसभर या संशयितांकडे पोलिस मुख्यालयात चौकशी सुरू असते. त्यानंतर त्यांची करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली जाते. (प्रतिनिधी) डायरीची चौकशीसहायक फौजदार संजय लोंढे व कॉन्स्टेबल बाबूमियाँ काझी यांनी इंदोरला चोरीच्या तपासासाठी जात असल्याची नोंद हुपरी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्ड डायरीमध्ये केली आहे. जिल्ह्याबाहेर व राज्याबाहेर तपासाला जाण्यासाठी पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधीक्षक ते पोलिस अधीक्षकांची मंजुरी घ्यावी लागते; परंतु हे दोघे मंजुरी न घेताच इंदोरला निघून गेले. त्यांची नोंद घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यासह पोलिस निरीक्षकाकडे चौकशी केली जाणार असल्याचे तपास अधिकारी मोहिते यांनी सांगितले.असे घेतले वाटून पैसे : सहायक फौजदार संजय लोंढे : ६ लाख कॉन्स्टेबल बाबूमियाँ काझी : ३ लाख वसंत धनाजीराव पाटील : १० लाख फैयाज बादशहा शेख : ४ लाख ३० हजार आशिष बाळासो मायगोंडा : ३ लाख ५० हजार जितेंद्रकुमार शर्मा : २ लाख सदानंद कांबळे : १ लाख ५० हजार चैनी, एकत्रित खर्च : १ लाख २० हजार