शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून युवतीने टाकली पंचगंगेत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 14:50 IST

Lovematter, Suicide, river, kolhapurnews, police प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय प्रेयसीने शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी टाकली, पाठोपाठ प्रियकरानेही नदीत उडी मारून प्रेयसीला नागरिकांच्या मदतीने वाचवले. संबंधित युवती गोकुळ शिरगाव येथील तर युवक हा पुनाळ (ता. पन्हाळा) येथील आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देप्रेम प्रकरणातून प्रेयसीने टाकली पंचगंगेत उडीप्रियकरानेही पाठोपाठ उडी टाकून युवतीस वाचवले

 कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय प्रेयसीने शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी टाकली, पाठोपाठ प्रियकरानेही नदीत उडी मारून प्रेयसीला नागरिकांच्या मदतीने वाचवले. संबंधित युवती गोकुळ शिरगाव येथील तर युवक हा पुनाळ (ता. पन्हाळा) येथील आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की संबंधित युवक हा गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये खासगी कंपनीत नोकरीस आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हे प्रेमीयुगल पन्हाळा मार्गावरून दुचाकीवरून येऊन शिवाजी पुलावर थांबले. या दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे शाब्दिक वादावादी झाली. या वादातूनच संबंधित युवतीने आपल्याकडील सॅक दुचाकीला अडकून रागाच्या भरात थेट पुलावरून पंचगंगा नदीच्या पाण्यात उडी टाकली.

भांबावलेल्या ३० वर्षीय प्रियकरानेही पाठोपाठ पाण्यात उडी टाकली. आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीकडे धाव घेतली. यावेळी काही काळ गोंधळ उडाला.

यावेळी शिवाजी चौकात बंदोबस्तासाठी असणारे  पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप निळपणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिवाची पर्वा न करता त्यांनी वडणगे बाजूने रस्त्यावरून नदीकडे धाव घेतली. त्याचवेळी ते तोल जाऊन पडले, तीव्र घसरतीला त्याना तीन-चार वेळा कोलांटी खाव्या लागल्या. त्यातूनही ते सावरून नदीपात्रानजीक पोहचले.

दरम्यान, प्रियकरानेही आपल्या प्रेयसीला पाण्यातून काठावर आणले.  पोलीस निरीक्षक संदीप निळपणकर यांनी त्या दोघांना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.दरम्यान, मदतीसाठी धावलेले पोलीस कॉन्स्टेबल निळपणकर हे जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, करवीर पोलीस ठाण्यात प्रेमीयुगुलांच्या चौकशीचे काम सुरू होते.  त्यांच्या नातेवाइकांना बोलवून  घेण्यात आले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस