शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढासळलेले - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 11:50 IST

politics, elecation, ajara, sugerfactory, chandrakantpatil, hasanmusrif, kolhapurnews राज्यातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देसत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढासळलेले - हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राज्यातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.आजरा येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. २१) पुण्यात केली होती, तिला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. त्यांनी दहा ते बारा लोकसभेच्या व तेवढ्याच वेळा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या.

देशाचे कृषिमंत्री, संरक्षणमंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले. याचे भान त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी ठेवावे. चंद्रकांत पाटील यांना पाच वर्षे चांगली संधी मिळाली होती; मात्र त्यांनी काहीही केले नाही. राज्याला सोडाच; कोल्हापूरलाही त्यांचा काहीही उपयोग झाला नाही.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, दिलीप लाड, मुकुंद देसाई, तानाजीराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. संभाजी तांबेकर यांनी स्वागत केले. आजराचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी प्रास्ताविक केले.पैसे घेऊन जाणारे आमचे उमेदवार नव्हेत.मेळाव्यापूर्वी मंत्री मुश्रीफ हे जनता बँकेत बसले असता, एका शेतकऱ्याने हातात पैसे भरल्याची पावती घेऊन विचारले,हिंदुस्तान शुगरच्या नावाखाली पैसे घेऊन गेलेले उमेदवार आलेत का? यावर ते आमचे उमेदवार नव्हेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले. त्या उमेदवाराची मात्र तालुक्यात जोरदार चर्चा झाली. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील