शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कुरूकलीच्या घोडेश्वर मंदिर परिसराचे रूप पालटले

By admin | Updated: October 16, 2015 00:48 IST

दसऱ्याच्या यात्रेला मंदिर सुसज्ज्य : एक कोटी रुपयांची विकासकामे पूर्णत्वाकडे

अनिल पाटील --मुरगूड--पश्चिम महाराष्ट्रातील व सीमाभागातील हजारो लोकांचे श्रद्धास्थान असलेले कुरुकली (ता. कागल) येथील घोडेश्वर मंदिर व परिसरामधील ‘ब’ वर्ग पर्यटन विकास निधीतून तब्बल एक कोटी रुपयांची विकासकामे पूर्णत्वाकडे नेल्याने मंदिराचे व परिसराचे रूपच पालटले आहे. विजया दशमी अर्थात दसऱ्याला होणाऱ्या यात्रेमधील यात्रेकरूंच्या स्वागतासाठी मंदिर सुसज्ज्य झाले आहे. मंदिर परिसराचा झपाट्याने विकास झाल्याने ग्रामस्थ व भक्तांतून समाधान व्यक्त होत आहे.कुरुकलीपासून दोन कि.मी. आत डोंगरावर वसलेल्या आणि निर्सगाच्या कुशीत असलेल्या घोडेश्वर मंदिरात शासनाकडून सुरुवीतस ‘क’ वर्गाचा दर्जा व नंतर ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाला, ‘ब’ वर्गात समावेश झाल्यानंतर शासनाकडून तब्बल दोन कोटी ८६ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तत्कालीन जलसंपदामंत्री व विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी या निधीसाठी विशेष प्रयत्न केले. तसेच तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही मंदिर विकासासाठी लाखो रुपयांचा निधी दिला होता. त्यामधून पाच लाख रुपये खर्च करून सुसज्य सभागृहाची वास्तू पूर्णत्वास गेली आहे. अर्थातच ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळात समावेश झाल्यानंतर परिसराचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. ‘क’वर्ग विकास निधीतून यात्री निवास, पालखीच्या मार्गावर पेव्हिंग ब्लॉक, परिसरातील रस्त्यांचे डांबकीरण अशी लाखो रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. ‘ब’ वर्गातील निधीतून परिसरामध्ये महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी स्वतंत्रकक्ष, स्वतंत्र स्वच्छतागृहे, संपूर्ण मंदिर परिसरामध्ये २५ लाख रुपये खर्च करून पेव्हिंग ब्लॉक घालण्यात आले आहेत. त्यामुळे पालखीचा मार्ग ही नवीनच झाला आहे. संपूर्ण मंदिरात सभोवताली संरक्षक भिंंतही बांधण्यास सुरुवात होणार आहे. या सर्वांमुळे या परिसराला झळाळी आली आहे. यावर्षी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या तक्रारी विचारात घेऊन मंदिर प्रशासन व ग्रामस्थ यांच्या नियोजनाने विविध बदल केले आहेत. त्यातील मंदिराला लागून असणारी खेळण्यांची, मिठाईची दुकाने, हॉटेल, पाळणे, आदींना ५०० मीटर दूर जागा मिळणार आहे. परिसरामध्ये जाण्या-येण्यासाठी एकेरी मार्गाचा अवलंब केला जाणार असल्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटणार आहे. यात्रा कार्यक्रममुख्य यात्रा २०, २१, व २२ आक्टोबरला होणार आहे. श्रींची पारंपरिक मुखवटा मिरवणूक २० आॅक्टोबरला कुरूकलीतून मंदिराकडे जाणार आहे. २१ ला श्रींचा जागर व त्याच दिवशी कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. गुरूवारी ( दि. २२) दुपारी तीन वाजता हजारो भक्तांच्या समवेत पालखी सोहळा पार पडणार आहे.