शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

कोल्हापुरात ‘लोकमत महामॅरेथाॅन’ जल्लोषात; पाचव्या पर्वाला नादखुळा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 08:26 IST

२१ किलोमीटर खुल्या गटात विवेक मोरे, रेश्मा केवटे विजेते

कोल्हापूर : पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात ढोल-ताशे, लेझीम, पोलीस बँड, शाळकरी मुलींचे नृत्य, आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतशबाजी, तरुण, तरुणींचा गगनचुंबी आत्मविश्वास, अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात कोल्हापूरची ‘लोकमत महामॅरेथाॅन’ रंगली. अत्यंत जल्लोषी वातावरणात रंगलेली महामॅरेथाॅन खुल्या गटात चंदगडच्या विवेक मोरे, तर म्हसवड (सातारा)ची रेश्मा दत्तू केवटे हिने जिंकली. विवेकने पुरुषांमधील २१ किलोमीटरची शर्यत १ तास ११ मिनिटे ३३ सेकंदांत, तर रेश्माने १ तास २४ मिनिटे आणि ६ सेकंदांत पूर्ण केली. राज्यभरात लोकप्रियता मिळविलेल्या महामॅरेथॉनची पुढील स्पर्धा २७ मार्च २०२२ रोजी नागपूर शहरात होणार आहे.

सकाळी सहा वाजता २१ किलोमीटरच्या खुल्या गटातील धावपटूंना पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाॅ. पी.एस. पाटील, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, आयकाॅन स्टीलचे सुजय माळी, जय चंदवाणी, कोटक महिंद्रा बँकेचे अक्षय कांबळी, राहुल माने, क्रोमाचे अंकुश पाटील, डीटीएचचे संदीप सिंग, घोडावत ग्रुपचे विनायक भोसले, विराट गिरी,  ‘लोकमत महामॅरेथाॅन’च्या संस्थापिका रुचिरा दर्डा, लोकमतचे सिनियर जी.एम. (कॉर्पोरेट) आशिष जैन, इव्हेंट हेड रमेश डेडवाल, रेस डायरेक्टर संजय पाटील, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांनी ‘फ्लॅग ऑफ’ केला आणि स्पर्धकांनी आपल्या ध्येयाकडे वेगाने धाव घेतली.

लोकमत महामॅरेथॉन सर्वव्यापी सहभाग‘लोकमत’ परिवाराच्या महामॅरेथॉन स्पर्धेने पाच वर्षांच्या मुलांपासून ते ऐंशी वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत, शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते उद्योजक - व्यावसायिक, व्यापाऱ्यांपर्यंत, प्राध्यापक - शिक्षकांपासून वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत, एनसीसी कॅडेट्सपासून पोलीस दल, अग्निशमन दलातील जवानांपर्यंत, हृदयशस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांपासून ते डॉक्टर्सपर्यंत अशा सर्वव्यापी, सर्वसमावेशक सहभागाची नोंद झाली.

विविध गटांतील निकाल२१ किलोमीटर (खुला गट -पुरुष) १. विवेक मोरे (चंदगड), १ तास ११ मिनिटे ३३ सेकंद, २. दिनकर गुलाब महाले (नाशिक), १ तास १३ मिनिटे २८ सेकंद , शहाजी किरुळकर, १ तास १४ मिनिटे २६ सेकंद.२१ किलोमीटर (खुला गट-महिला) १. रेश्मा दत्तू केवटे, (म्हसवड, सातारा), १ तास २४ मिनिटे ६ सेकंद, २. रोहिणी लक्ष्मण पाटील (शेंद्री, सातारा), १ तास ३१ मिनिटे ७ सेकंद, सपना पटेल, (उत्तर प्रदेश), १ तास ३२ मिनिटे ४१ सेकंद.१० किलोमीटर (खुला गट-पुरुष) १. उपेंद्र बालियान, (नाशिक),  ३१ मिनिटे २७ सेकंद, २. अभिषेक देवकाते (उंचगाव, करवीर), ३२ मिनिटे ४९ सेकंद, ३. गोल्डी गोसामी, ३३ मिनिटे २७ सेकंद.१० किलोमीटर ( खुला गट-महिला) १. सृष्टी श्रीधर रेडेकर, (नेसरी, गडहिंग्लज) ३८ मिनिटे ३८ सेकंद, २. वैष्णवी सावंत (सातारा), ३९ मिनिटे १४ सेकंद, ३. साक्षी शिवानंद हुक्केरी (नेसरी, गडहिंग्लज) ४१ मिनिटे ३५ सेकंद.२१ किलोमीटर (प्रौढ गट-पुरुष) १. जोस, (वायनाड, केरळ) १ तास २२ मिनिटे ४७ सेकंद, २. दत्तात्रय जायभाय (अहमदनगर) १ तास २२ मिनिटे ५४ सेकंद, भास्कर मधुकर कांबळे (वाशिम) १ तास २५ मिनिटे ७ सेकंद.२१ किलोमीटर (प्रौढ गट-महिला) १. वैशाली गर्ग, १ तास ४६ मिनिटे ३८ सेकंद, २. डाॅ. शिल्पा दाते, १ तास ५९ मिनिटे १४ सेकंद, कविता जाधव, २ तास ११ मिनिटे ५६ सेकंद.१० किलोमीटर (प्रौढ गट -पुरुष) १. समीर कुमार कोलये (पश्चिम बंगाल) ३८ मिनिटे २ सेकंद, २. रणजित कणबरकर ३९ मिनिटे ४० सेकंद, ३. रमेश चिविलकर,(नाशिक) ४१ मिनिटे ५८ सेकंद,१० किलोमीटर (प्रौढ गट -महिला) डाॅ. इंदू टंडन (मुंबई) ४८ मिनिटे ३६ सेकंद, अलमास अमर मुल्लाणी (सातारा) ५० मिनिटे ५५ सेकंद, प्रतिभा नाडकर (मुंबई) ५२ मिनिटे ३६ सेकंद.२१ किलोमीटर (डिफेन्स गट पुरुष) १. अंबुज तिवारी, (आर्टलरी, नाशिक) १ तास १३ मिनिटे ५२ सेकंद, २. प्रशांत अलदार (सोलापूर, माजी सैनिक)१ तास २५ मिनिटे ४३ सेकंद, अविनाश पटेल (आर्टलरी, नाशिक) १ तास २७ मिनिटे ३३ सेकंद.२१ किलोमीटर (डिफेन्स गट महिला) १. सोनाली देसाई, १ तास ३१ मिनिटे १४ सेकंद. २. अर्चना बाबासाहेब कोहकडे, १ तास ३६ मिनिटे ४९ सेकंद, ३. रोशनी भुरे १ तास ४३ मिनिटे २६ सेकंद. 

टॅग्स :Marathonमॅरेथॉनkolhapurकोल्हापूर