शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Lok sabha election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात १६ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 15:54 IST

नवीन मतदान नोंदणी ९ एप्रिलपर्यंत, जेवनावळी, सार्वजनिक कार्यक्रमांवर वॉच

कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १६ हजार १६६ कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. निवडणूक जाहीर होताच चोवीस तासांच्या आत शासकीय कार्यालयांच्या आवारातील फलक काढण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणचेही फलक काढले जात आहेत. मतदारांना आमिष दाखविणाऱ्या कार्यक्रमासंबंधी आणि आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार सीव्हीझील ॲपवर ऑनलाइन नोंदवता येणार आहे. या तक्रारींवर पुढील १०० मिनिटांमध्ये निवडणूक यंत्रणेकडून कार्यवाही करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभेसाठी नवीन मतदार नोंदणी दि. ९ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस तास स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला आहे. उमेदवारांनी त्यांच्या प्रचारासाठी तसेच विविध रॅली बैठकांसाठी अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकीची सुविधा केली आहे. याशिवाय विधानसभा मतदारसंघ स्तरावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एक खिडकी सुरू केली आहे.उमेदवारी अर्ज दि. १२ ते १९ एप्रिलअखेर कार्यालयीन दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत दाखल करता येणार आहे. दि. १३ एप्रिलला चौथा शनिवार, दि. १४ एप्रिलला रविवार हे शासकीय सुटीचे दिवस आणि दि. १७ एप्रिलला रामनवमीची या सार्वजनिक सुटीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहने आणता येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारासह पाचजणांनाच प्रवेश असेल. सार्वजनिक सुटीच्या दिवशी उमेदवारी अर्ज नाही.

कोल्हापूरसाठी मतमोजणी शासकीय गुदामकोल्हापूर लोकसभेसाठी स्ट्राँग रूम रमणमळ्यातील शासकीय गुदाम असेल. तिथेच मतमोजणी होईल. हालकणंगले मतदारसंघांसाठीची स्ट्राँग रूम राजाराम तलावाजवळील शासकीय गुदाम राहील. तेथेच मतमोजणी होईल.

३८४ उमेदवारांपर्यंतच ईव्हीएमवरएका मतदारसंघात ३८४ उमेदवारापर्यंतच ईव्हीएम यंत्रावर मतदान घेणे शक्य आहे. यापेक्षा अधिक उमेदवार झाल्यास कशापद्धतीने मतदान घ्यायचे, याचा आदेश निवडणूक आयोग देईल. त्याप्रमाणे कार्यवाही होईल, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी स्पष्ट केले.फक्त फोटो व्होटर स्लीपवर मतदान नाही..

येडगे म्हणाले, मतदानासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असल्यास त्याने एकूण ११ पैकी एक कोणतेही ओळखपत्र दाखविल्यास त्याला मतदान करता येईल. फक्त फोटो व्होटर स्लीपच्या आधारावर मतदान करता येणार नाही. ईपीक कार्ड असणे म्हणजे मतदाराला मतदानाचा अधिकार नसून त्यासाठी मतदार यादीत त्या मतदाराचे नाव असणे आवश्यक आहे.

खर्चाची मर्यादा ९५ लाखयेडगे म्हणाले, एका उमेदवारास निवडणूक खर्चाची मर्यादा ९५ लाख असेल. उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवाराला खर्चाचा हिशेब दररोज दुपारी दोन वाजेपर्यंत देणे बंधनकारक आहे. अंतिम हिशोब उमेदवार निवडून आल्यानंतर ३० दिवसांत दाखल करणे बंधनकारक राहील.

निवडणूक कार्यालय हे असतील

कोल्हापूर लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक कार्यालय असेल. जिल्हाधिकारी अमोल येडगे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. हातकणंगलेसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक कार्यालय असेल. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे हे हातकणंगलेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.

मतदारसंघनिहाय मतदार असेकोल्हापूर : १९ लाख २१ हजार ९३१, पुरुष : ९ लाख ७७ हजार ७१०, स्त्री : ९ लाख ४४ हजार १३२, तृतीयपंथी : ८९हातकणंगले : १८ लाख १ हजार २०३, पुरुष : ९ लाख १९ हजार ६४६, स्त्री : ८ लाख ८१ हजार ४६६, तृतीयपंथी : ९१

होम व्होटिंगची सुविधाजिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ८५ टक्क्यांवरील मतदार, दिव्यांग, गर्भवतींना होम व्होटिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. होम व्होटिंगसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना मतदान केंद्रावर येऊन मतदान करता येणार नाही.

  • कोल्हापूरसाठी मतदान केंद्र : २१५६,
  • एकूण सैनिक मतदार : ६ हजार ४६७,
  • दिव्यांग मतदार : १६ हजार ८५२
  • ८५ वर्षांवरील मतदार : २६ हजार ४७ 
  • हातकणंगलेसाठी मतदान केंद्र : १८६०,
  • एकूण सैनिक मतदार : ४ हजार १७४
  • ८५ वयावरील मतदार : २२ हजार ६३९
  • जिल्ह्यातील १८ ते १९ वयोगटांतील मतदार : ३९ हजार ६३३
टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक