शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : चंद्रकांत पाटील म्हणतात, वसंतदादा घराण्याच्या बंडखोरीत माझाच हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 16:10 IST

राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो. वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे. मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देवसंतदादा घराण्याच्या बंडखोरीत माझाच हात :चंद्रकांत पाटील सर्वच चांगल्या गोष्टीला मी कारणीभूत

सांगली : राज्याच्या राजकारणात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यात माझा हात असतो. वसंतदादा घराण्यात झालेल्या बंडखोरीच्या घटनेमागेही माझाच हात आहे. मी चांगल्या गोष्टीतील सहभाग नाकारत नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.सांगली लोकसभा मतदारसंघासाठी खासदार संजयकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आमच्या उमेदवाराविरोधात उभारण्यासाठी कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. सांगलीच्या जागेंसाठी कॉंग्रेसेकडे उमेदवार नसल्याने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडेही चांगला उमेदवार नाही.

त्यामुळे भाजपचा याठिकाणचा विजय निश्चित झाला आहे. वसंतदादा घराण्याने बंडखोरीचा इशारा दिला असेल आणि त्यामागे माझा हात असल्याची चर्चा केली जात असेल तर मी त्या गोष्टी स्वीकारत आहे. अशा चांगल्या गोष्टीत माझा हात नक्कीच असतो.जयंत पाटील यांनी भाजपमध्ये आयात उमेदवारांचीच गर्दी असल्याची व भाजपची स्वत:ची ताकद कुठेही दिसत नसल्याची टीका केली होती. त्यास उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना आजवर त्यांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सांभाळता आले नाही. त्यांना योग्य न्यायसुद्धा देता आला नाही. त्यामुळे असे नाराज झालेले लोक भाजपमध्ये समाधानाने येत आहेत. जयंत पाटील यांनी आता भाजपच्या ताकदीवर बोलण्यापेक्षा आहे ते लोक सांभाळण्याचे काम केले तर ते त्यांच्यासाठी चांगले आहे.आम्ही उमेदवार विकत घेऊ, नाहीतर फुकट!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना घोटाळ््याच्या पैशातून विकत घेतले आहे का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही उमेदवार विकत घेऊ, नाहीतर फुकट घेऊ. तो आमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आम्हाला काय मिळते यापेक्षा शेट्टी यांना आता किती जागा लोकसभेच्या मिळणार, याची चिंता करावी.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटील