शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीतील बोगसगिरी, यादीत आमदार प्रकाश आबिटकरांचे नाव, ‘आयटी’ विभागाचा सावळागोंधळ, सहकार विभागात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 12:59 IST

राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या ग्रीन यादीत शिवसेनेचे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील आमदार प्रकाश आबीटकर यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी स्वता विधीमंडळात याचा गौप्यस्फोट केला आहे. राज्य सरकारच्या ‘आयटी’ विभागाचा सावळागोंधळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देस्वता प्रकाश आबीटकर यांचा विधीमंडळात गौप्यस्फोट खात्यावर २५ हजार रूपये अनुदान वर्ग झाल्याने खळबळ आॅनलाईन अर्ज दाखल केला नसताना त्यांचे नाव यादीत सगळ्या कर्जदारांच्या माहितींने गोंधळ

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या ग्रीन यादीत शिवसेनेचे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी स्वता विधीमंडळात याचा गौप्यस्फोट केला आहे. राज्य सरकारच्या ‘आयटी’ विभागाचा सावळागोंधळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अशी आणखी किती जणांची नावे या यादीत आली आहेत, याची चौकशी होण्याची गरज आहे. कर्जमाफीतील बोगसगिरी टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज मागवले, याची संपुर्ण जबाबदारी आयटी विभागाकडे दिली. पण गाव पातळीवरील यंत्रणा पाहिली तर सुरूवातीपासूनच कर्जमाफी योजनेचा फज्जा उडत गेला.

याद्यातील नावे, खाते क्रमांकासह इतर त्रुटी दूर करताना सहकार विभाग व जिल्हा बॅँक प्रशासनाच्या तोंडाला फेस आला. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक ग्रीन यादीत काही ना काही गोंधळ राहिलाच. ज्यांनी अर्ज केलाच नाही, त्यांची नावे कर्जमाफीत आढळली, त्याचबरोबर थकीत रक्कमेपेक्षा कर्जमाफीची रक्कम जादा पाठवली गेली. त्यामुळे संबधित खात्यांचा जमा खर्च झालाच नाही.

प्रोत्साहन पर यादीत चक्क आमदार प्रकाश आबीटकर यांचे नाव आढळले. त्यांच्या खात्यावर २५ हजार रूपये अनुदान वर्ग झाल्याने खळबळ उडाली. त्यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केला नसताना त्यांचे नाव यादीत आलेच कसे? अशी विचारणा त्यांनी शुक्रवारी विधीमंडळात करून सरकारच्या कर्जमाफीचा पोलखोळ केला. आमदार आबीटकर यांच्या गौप्यस्फोटाने सहकार विभाग खडबडून जागे झाले असून नेमकी चूक कोणाची याचा शोध शोध सुरू झाली आहे.‘आयटी’चा डोळेझाकपणा नडला!पहिल्या ग्रीन यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ होता. ज्यांनी कर्जमाफीसाठी अर्जच केलेला नाही, अशांची नावे या यादीत होती, त्याच वेळी ‘आयटी’ विभागाने सहकार विभागाच्या मदतीने छाननी करणे अपेक्षित होते.

सगळ्या कर्जदारांच्या माहितींने गोंधळकर्जमाफीसाठी स्वताहून अर्ज केले, पण त्याबरोबर ‘आयटी’ विभागाने सर्व कर्जदार व थकबाकीदारांची माहिती जिल्हा बॅँकांकडून मागितली होती. या दोन्ही डाटा मध्ये गफलत होऊन अशी नावे घुसल्याचा अंदाज सहकार विभागाचा आहे.

 

आॅनलाईन अर्जांची माहिती आमच्याकडे नव्हती. बॅँकेने कोणाला किती कर्ज दिले त्याची निकषाप्रमाणे आम्ही तपासणी केली.त्यामधील त्रुटी दुरूस्त करून याद्या अपलोड केल्याने आमच्या पातळीवर हा गोंधळ झालेला नाही.- अरूण काकडे,जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर 

टॅग्स :Prakash abitkarप्रकाश आबिटकरNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७