शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

जिल्ह्यातील ८८७ मद्यालयांना कुलूप

By admin | Updated: April 2, 2017 00:38 IST

व्यावसायिकांचे धाबे दणाणले : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी

कोल्हापूर : महामार्गालगत ५०० मीटर अंतरावर असणारी मद्यालये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसाार शनिवारपासून बंद करण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे १३५५ पैकी ८८७ मद्यालये भरारी पथकाने सीलबंद केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील सुमारे २० कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. विशेष म्हणजे या कारवाईत कोल्हापूर शहरातील २१० पैकी सुमारे १६१ मद्यालये बंद करण्यात आली. दिवसभर वाईन शॉप, परमिट रूम, बीअर शॉपी, देशी दारू दुकानांच्या सीलबंदच्या कारवाईनंतर सायंकाळी डॉ. सैनी यांनी भरारी पथकाची बैठक घेऊन आढावा घेतला. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर होणारे अपघातांचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी महामार्गांलगत ५०० मीटर अंतरापर्यंतची असणारी सर्व मद्यालये बंद करण्याचा आदेश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, त्याची अंमलबजावणी शनिवारपासून करण्यात आली. तत्पूर्वी, शुक्रवारीच (दि. ३१) या सर्व मद्यालयांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोटिसा बजावल्या होत्या. शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक संजय पाटील, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने, महसूल खात्याचे अधिकारी (तहसीलदार), महानगरपालिका, शहर नगररचना विभाग यांच्या सहा भरारी पथकांनी सकाळपासून कारवाई सुरू केली. या कारवाईत यामुळे वाईन शॉप, परमिट रूम, बीअर शॉपी, देशी दारू या व्यावसायिकांचे धाबे दणाणले. दिवसभर विविध पथकांनी सीलबंदची कारवाई केल्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी या पथकांच्या बैठका घेऊन कारवाईचा आढावा घेतला. या पथकांतर्फे पुणे-बंगलोर महामार्ग, कोल्हापूर-सांगली मार्ग, कोल्हापूर ते राधानगरी, कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागिरी, कोल्हापूर (संभाजीनगर बसस्थानक) ते गारगोटी मार्गावर, ताराराणी चौक ते रंकाळा तलाव, जुना पुणे-बंगलोर महामार्ग (संगम चित्रमंदिर मार्ग) या मार्गावर ही मद्यालये सीलबंदची कारवाई करण्यात आली. वॉईन्स मर्चंट्सची भेट नाकारलीया कारवाईला सहा महिने मुदतवाढ द्यावी, यासाठी कोल्हापूर वाईन मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते; पण जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी त्यांना भेट नाकारली.कारवाईत या प्रमुख मद्यालयांचा समावेशहॉटेल सयाजी, ओपल, पर्ल, टुरिस्ट, इंटरनॅशनल, प्रार्थना, अयोध्या, रायसन, सनरेज, गिरीश, सुब्राया, ग्रीनलँड, रजत, सनस्टार, वामन, इंद्रप्रस्थ, कोहिनूर, पंचशील, आॅट्रिया, (सर्व स्टेशन रोड); वृषाली (ताराबाई पार्क), प्रसाद (शाहूपुरी), शेतकरी (फुलेवाडी), पॅव्हिलियन (नागाळा पार्क), रसिका गार्डन (मार्केट यार्ड), पूजा (व्हीनस कॉर्नर), साईदर्शन (मार्केट यार्ड), गोल्ड स्टार (भाऊसिंगजी रोड), मधू (शिवाजी चौक), रणजित डिलक्स (जोतिबा रोड), रविराज (मिरजकर तिकटी), सोनल (रंकाळा वेश), इंदिरासागर, (संभाजीनगर), रॉयलरूफ, उजाला (साने गुरुजी वसाहत), प्रतीक (संभाजीनगर), वनराई (आपटेनगर), क्लासिक (रंकाळा वेश), न्यू सीमा (लक्ष्मीपुरी).चार कोटींचा महसूल जमाकारवाई झालेल्या मद्यालये मालकांनी ३१ मार्च वर्षअखेरपर्यंत पुढील वर्षाच्या नूतनीकरणासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा महसूल शासनाकडे जमा केला होता, पण अचानक ही सीलबंदची कारवाई करण्यात आली. पण हा जमा केलेला महसूल त्या-त्या मद्यालये मालकांना परत देण्याचा विचार करण्यात येत आहे.२० कोटींचा महसूल बुडालाया बंद केलेल्या सुमारे ८८७ मद्यालयांकडून प्रतिवर्षी सुमारे २० कोटींचा एकूण महसूल शासनाकडे जमा होत होता. या कारवाईमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला याचा फटका बसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून जी मद्यालये बंद करण्यात आली आहेत, त्यांना मागणीनुसार स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थलांतरित शुल्क द्यावे लागणार नाही. - डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारीशहरातील २१० पैकी १६१ बंदकोल्हापूर शहरात परमिट रूम, वॉईन्स शॉप, देशी दारू दुकाने, बीअर शॉपी अशी एकूण २१० मद्यालये आहेत; पण न्यायालयाच्या नियमानुसार महामार्गांच्या ५०० मीटर अंतरामध्ये सुमारे १६१ मद्यालये येत असल्याने ती सीलबंद करण्यात आली. जिल्ह्यातील बंद झालेली मद्यालयेअ.क्र.कार्यक्षेत्रअनुज्ञप्तीचा प्रकार एकूणदेशी वाईनपरमिटबीअरदारूशॉपशॉपी१हातकणंगले तालुका२६६११०३३१७५२कागल तालुका२४२५९२०१०५३कोल्हापूर शहर२७१७८८२९१६१४शाहूवाडी तालुका४६२८३१०३२३४५गडहिंग्लज तालुका२७३७३२५१२८६इचलकरंजी शहर१६२५९७८४एकूण१६६३२४७२२१७८८७