शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कर्जाचे आमिष दाखवून व्यावसायीकाला साडेसात लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:10 IST

बजाज फायनान्समधून ३० लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगून हॅकर्सनी खासगी व्यावसायीकास साडेसात लाख रुपयांना आॅनलाईन गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित काव्या कुलकर्णी, नेहा सावंत, अमोल पवार, राजीव राणे या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुरुवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देकर्जाचे आमिष दाखवून व्यावसायीकाला साडेसात लाखांचा गंडाआॅनलाईन फसवणूक, पाचजणांवर गुन्हा, रॅकेटची व्याप्ती मोठी

कोल्हापूर : बजाज फायनान्समधून ३० लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगून हॅकर्सनी खासगी व्यावसायीकास साडेसात लाख रुपयांना आॅनलाईन गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित काव्या कुलकर्णी, नेहा सावंत, अमोल पवार, राजीव राणे या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुरुवारी (दि. ९) गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी सांगितले, रामदास पांडुरंग सुरवसे (वय ३५, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) यांचा खासगी व्यवसाय आहे. त्यांच्या मोबाईलवर १६ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रिया शर्मा नावाच्या मुलीचा फोन आला. ‘मी बजाज फायनान्समधून बोलत आहे. तुम्हाला कर्ज मंजूर झाले आहे. त्याकरिता काव्या कुलकर्णी हिच्या व्हॉट्स अ‍ॅप नंबरवर तुमची कागदपत्रे पाठवा,’ असे त्याद्वारे सांगितले.

सुरवसे यांनी कागदपत्रे पाठविल्यानंतर सात लाख ६१ हजार रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर नेहा सावंत, अमोल पवार यांनी फोन करून पूर्ण वार्षिक हप्त्याची रक्कम भरा; तसेच तुम्हाला जीएसटी, तिकीट आॅफर ३० लाखांपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर राजीव राणे याने वारंवार फोन करून पैसे भरण्यास सांगितले.

संशयितांनी सुरवसे यांचा विश्वास संपादन करून त्यांचे वेगवेगळ्या बँक खात्यांतून सुमारे सात लाख ६१ हजार रुपये भरून घेतले. त्यानंतर कर्जाची रक्कम मागितली असता सगळेच फोन बंद असल्याचे दिसून आले. त्यांना वेगवेगळ्या पाच मोबाईल नंबरवरून कॉल आले होते. त्यांनी स्थानिक बजाज फायनान्सच्या कार्यालयात चौकशी केली असता कंपनीतून असा कोणताही फोन केला नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरवसे यांनी सायबर शाखेकडे तक्रार दिली.

रामदास सुरवसे यांच्याशी दोनच व्यक्ती वेगवेगळी नावे सांगून बोलत असाव्यात. त्यामध्ये तरुणी आणि तरुणाचा समावेश असण्याची शक्यता आहे. आॅनलाईन फसवणुकीचे रॅकेट मोठे आहे. संबंधित बँक खात्यांची चौकशी सुरू असून बँकांना पत्र दिले आहे. लवकरच हॅकर्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.संजय मोरे,पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र