शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजनेतील १४५ कोटींचे कर्ज बुडणार, कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी ११३२ कोटींचे वाटप 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 10, 2024 16:33 IST

राजकीय दबावापोटी सरकारी यंत्रणा हतबल

इंदुमती गणेशकोल्हापूर : लहान व्यावसायिकांसाठी वरदान ठरलेल्या मुद्रा योजनेंतर्गत आजवर दिल्या गेलेल्या कर्जापैकी १८ हजार ३११ खातेदारांचे विविध बँकांचे जवळपास १४५ कोटी रुपये बुडण्याच्या मार्गावर आहेत. ही योजना २०१५ मध्ये साली सुरू झाली असून मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ११३२ कोटींचे कर्ज वाटप झाले. यामध्ये सर्वाधिक कर्ज तरुण उद्योजकांना वाटप झाले आहे. परंतु सरकारी योजनांतून कर्ज प्रकरणे मंजूर करून घ्यायची आणि त्याचे हप्ते फेडले नाहीत तरी चालतात, किंवा निवडणुका आल्यावर सरकारच माफ करते अशी लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे नियमित हप्ते भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारी यंत्रणांचेही राजकीय दबावापोटी हात बांधलेले असतात, परिणामी वसुलीवर मर्यादा येत असल्याचे अनुभव आहेत.स्वत:चा व्यवसाय सुरू करणे म्हणजे येरागबाळ्याचे काम त्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते, ज्यांना शून्यातून आणि कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी मुद्रा याेजनेसारखी योजना नाही. या योजनेअंतर्गत लहान व्यावसायिकांना कोणत्याही तारणाशिवाय १० लाखांचे कर्ज मिळते. पण या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. अग्रणी बँकेकडील आकडेवारीनुसार योजना सुरू झाल्यापासून आजवर १८ हजार ३११ खातेदारांची १४५ कोटींची रक्कम थकित आहे. हे प्रमाण ८ टक्के इतके आहे.

‘मुद्रा’चे तीन प्रकारचे कर्ज

  • शिशू कर्ज : या श्रेणीत ५० हजारांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
  • किशोर कर्ज : किशोर श्रेणीत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
  • तरुण कर्ज : या श्रेणीत ५ ते १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

वर्ष : कर्जाची एकूण रक्कम

  • २०२१-२२ : ४९४.९७ कोटी
  • २०२२-२३ : ९६४.१५ कोटी
  • २०२३-२४ : ११३१.७७ कोटी
  • एकूण : २ हजार ५९०.८९ कोटी

कर्ज थकीत राहण्याची कारणे

  • ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतलेे आहे, त्या व्यवसायात अपयश.
  • व्यवसायाऐवजी अन्य कारणासाठी रकमेचा वापर.
  • कर्ज घेण्यापुरता व्यवसाय दाखवणे.

राज्यात ४ हजार कोटीकोल्हापूरच नव्हे तर राज्यातही मुद्रा अंतर्गत दिलेल्या कर्जापैकी एकूण ४ हजार कोटींच्या कर्जाची थकबाकी आहे. यात सर्वाधिक एनपीएचे प्रमाण किशोर गटात आहे. यामध्ये २७ हजार ४२२ खातेदारांचे १३४२ कोटी रुपये थकीत आहेत.

मुद्रा योजनेचा लाभ घेत अनेक लाेकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहे. त्यांच्याकडून कर्जाची नियमित परतफेड सुरू आहे. योजनांचा लाभ घेताना नागरिकांनीदेखील आर्थिक शिस्त बाळगणे गरजेचे आहे. कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी करत स्वत:ची, जिल्ह्याच्या व राज्याच्या आर्थिक सुबत्तेत हातभार लावावा. -गणेश गोडसे, जिल्हा समन्वयक. अग्रणी बँक कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक