शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत कर्ज-दीपक म्हैसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:04 IST

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती वरणगे (ता. करवीर) येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

ठळक मुद्देआधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत कर्ज-दीपक म्हैसेकर वरणगे येथे प्रमाणीकरण प्रक्रियेची पाहणी

कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती वरणगे (ता. करवीर) येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.करवीर तालुक्यातील वरणगे येथील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, तहसीलदार शीतल मुळे-भामरे, गट विकास अधिकारी सचिन घाडगे, वरणगेच्या सरपंच अर्पणा पाटील उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण नोंद पावतीचे वितरणही करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या योजनेंतर्गत जिल्ह्यात ४२ हजार ९१३ थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत ३८ हजार २०० थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून त्यांना कर्जमुक्त करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. आजवर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे १०९ कोटी रुपये जमा झाल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी म्हैसेकर यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम गतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तत्काळ करावे, अशी सूचना संबंधित विभागाला दिली. यावेळी त्यांच्या हस्ते निवृत्ती पाटील, शिवाजी तिबिले, पांडुरंग पाटील, दगडू तिबिले, शालिनी पाटील, अनिल पाटील या थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण नोंद पावतीचे वितरण करण्यात आले. 

 

टॅग्स :commissionerआयुक्तAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर