शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मांजात अडकलेल्या कावळ्याला तरुणांकडून जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:21 IST

मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या दोन कावळ्यांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली. ​​​​​​​

ठळक मुद्देमांजात अडकलेल्या कावळ्याला तरुणांकडून जीवदानहुतात्मा पार्कातील घटना: आठवड्यातील दुसरा प्रकार

कोल्हापूर : मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या दोन कावळ्यांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली.‘ढील ढील दे दे रे रे रे भैय्या, इस पतंग को ढील दे......’ असे गाणे गुणगुणत पतंग उडवणे सोपे असते. एकमेकांचा पतंग कापता यावा, म्हणून वापरल्या जाणाऱ्या या मांजा दोऱ्यामुळे मात्र अशा निरपराध जिवांचे दोरच कापले जात आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत.

चार, पाच दिवसांपूर्वी बिंदू चौकातील एका उंच झाडावर मांजा दोऱ्यामध्ये अडकलेल्या कावळ्याला जीवदान दिले होते. बुधवारी हुतात्मा पार्कात आणखी एक कावळा असा दोऱ्यात अडकल्याचा फोन तेथील व्यावसायिक शेखर वाघमारे यांंनी केला. क्षणाचाही विलंब न करता संदीप देवकुळे, आशुतोष सूर्यवंशी, अवधूत पाटील, देवेंद्र भोसले, अनिकेत खोत, अनिरुद्ध सावंत, ओमकार पाटील, अभिजित सूर्यवंशी हे मित्र धावले.झाड खूपच उंचीवर, ओढ्यालगत आणि खूप धोकादायक असल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. झाडावरून काढत असताना कावळा खाली ओढ्यात पडला. ओढ्यातील सांडपाण्याला दुर्गंधी सुटलेली असतानाही आशितोष सूर्यवंशी व अवधूत पाटील हे दोघे त्या सांडपाण्यात उतरले.

माणुसकीवरून विश्वास उडाल्याने कदाचित तो कावळा दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता. पण पंख आणि पाय हे मांजामध्ये अडकल्याने अखेर त्याने सहकार्य केले. मांजाची खूप गुंतागुंत झाली होती. कावळ्याला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन त्या सगळ्या त्रासातून त्याची मुक्तता केली.

कावळ्याच्या जिवाचा प्रश्न सुटला पण हे जर असंच चालत राहिलं तर आपण आपल्या हौसेखातर अशा निरपराध पशुपक्ष्यांचा बळी घेणार का? हा प्रश्न मात्र आ वासून उभा आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आपला छंद, आवड आपण जरूर बाळगावी पण त्यामुळे एखाद्याचा जीव जात असेल तर तो छंद, ती आवड काय कामाची?- संदीप देवकुळे, सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान

 

टॅग्स :environmentपर्यावरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्यkolhapurकोल्हापूर