शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

थेट पाईपलाईन योजना : जलशुद्धिकरण केंद्राची जूनमध्ये चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:55 IST

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत धरणक्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या इंटकवेल व जॅकवेलचे काम साठ दिवसांत पूर्ण करण्याचा; तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पुईखडी येथे बांधलेल्या जलशुद्धिकरण केंद्राची चाचणी घेण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

ठळक मुद्देथेट पाईपलाईन योजना : जलशुद्धिकरण केंद्राची जूनमध्ये चाचणीइंटकवेल, जॅकवेलचे काम साठ दिवसांत पूर्ण करणार

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत धरणक्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या इंटकवेल व जॅकवेलचे काम साठ दिवसांत पूर्ण करण्याचा; तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पुईखडी येथे बांधलेल्या जलशुद्धिकरण केंद्राची चाचणी घेण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.योजनेचे काम समाधानकारक नसल्याबद्दल तसेच कामाचा बार चार्ट सुकाणू समितीला दिला नसल्याबद्दल कंपनीच्या तसेच सल्लागार कंपनीच्या अधिकाऱ्यांची भाजपचे गटनेते विजयराव सूर्यवंशी, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, अजित ठाणेकर यांनी चांगलीच कानउघाडणी केली. ‘कामाचा बार चार्ट एक महिन्यात देण्याचे ठरले असतानाही तुम्ही दिला नाही. तुम्ही आमची चेष्टा करताय का?’ अशी विचारणा प्रा. पाटील यांनी केली. ‘काम होणार आहे की नाही आणि होणार असेल तर कधीपर्यंत होईल, हे एकदा सांगून टाका,’ अशी सूचना हसिना फरास यांनी केली.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपणाला मागच्या बैठकीचा इतिवृत्तान्त आताच मिळाल्याचे सांगताच नगरसेवक, पदाधिकारी आणखी भडकले. हेडवर्क जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत योजना पूर्णत्वाकडे जाणार नाही, हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार याची ठोस माहिती द्या, अशी सर्वच सदस्यांनी केली.

यावेळी प्रकल्प प्रमुख राजेंद्र माळी यांनी हेडवर्कची कामे सुरू झाली असून, पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण होतील अशी माहिती दिली. त्यांची बाजू उचलून धरत युनिटी कन्सल्टन्सीचे महेश पाठक यांनी खुलासा केला की, धरणक्षेत्रात काम करण्यास अद्याप ६५ दिवस आपणास मिळणार आहेत. तसेच तयार केलेल्या बार चार्टचा विचार केला तर उपलब्ध कालावधीत हे काम नक्की पूर्ण होईल.जलवाहिनी जोडकामाच्या तपासणीबाबत अजित ठाणेकर यांनी संशय उपस्थित केला. वेल्डिंग करतानाचे चित्रीकरण करण्यात आलेले नाही, तसेच ते मजबूत झाले की नाही याची खात्री कोणीच देत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. १३ कोटींचे उपसा पंप घेण्यात केलेली घाई तसेच विद्युत पुरवठ्याचा विषयही ठाणेकर यांनी उपस्थित केला. त्यावरही बैठकीत बरच खल झाला.विनाखंडित विद्युत पुरवठ्यासंदर्भात मंजूर आराखड्यानुसार बिद्री उपकेंद्रातून एक लाईन घेण्याचे तसेच दुसरा पर्याय असणाºया राधानगरी उपकेंद्रातून लाईन घेण्यास राज्य व केंद्र सरकारकडून मंजुरी घेण्याचे बैठकीत ठरले. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपसा पंपाबाबत अधिकारी ठामजॅकवेलवर पाणी उपशाकरिता व्हर्टिकल पंप बसविण्यात येणार आहेत; परंतु अजित ठाणेकर फ्लोटिंग पंप बसवा, असा आग्रह करीत होते. मात्र व्हर्टिकल पंपच टिकाऊ आणि कार्यक्षम असल्याचा दावा राजेंद्र माळी यांनी केला.

कामात पारदर्शकता राखायोजनेच्या कामात पारदर्शकता राखा. नगरसेवकांना माहिती द्या. तसेच कामाची माहिती महपालिकेच्या वेबसाईटवरही टाका, अशा सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या. उपअभियंता कुंभार यांना ‘या कामात लक्ष घाला,’ अशी ताकीदही आयुक्तांनी दिली. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर