शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

निसर्गातूनच साहित्य साकारते : कृष्णात खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:40 IST

कोल्हापूर : निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला चांगले शब्द सुचतात आणि त्या शब्दांतून साहित्य साकारते, असे प्रतिपादन ...

ठळक मुद्देशिवाजी मराठा हायस्कूलमध्ये दुसरे बाल साहित्य संमेलन

कोल्हापूर : निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला चांगले शब्द सुचतात आणि त्या शब्दांतून साहित्य साकारते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार कृष्णात खोत यांनी शुक्रवारी केले.येथील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या बाल स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, माती, पाणी आणि आपल्या सभोवतालशी बोला, नक्की चांगलंच लिहाल.

इयत्ता १0 वीत शिकणाºया रेश्मा राठोड या विद्यार्थिनीने स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या भाषणात फक्त रेकॉर्ड डान्सभोवती गुरफटलेल्या आणि गेल्या काही वर्षांतील बदललेल्या हिडीस स्वरूपाच्या स्नेहसंमेलनावर आपले मत व्यक्त केले. या शाळेच्या बाल स्नेहसंमेलनाचा आदर्श यावर्षी इतर शाळांनी घेतल्याचा आवर्जून उल्लेखही तिने आपल्या भाषणात केला.

‘जात आमुची पुसू नका, धर्म आमुचा पुसू नका, उद्यानातील फुलास त्याचा, गंध कोणता पुसू नका’ अशा काव्यपंक्तीने विद्यार्थ्यांनी काव्यसंमेलनातही रंगत आणली. आपल्या सुंदर अभिनयाने घरातील पालकांचे मुलांशी असलेले नाते सांगताना विशाल सावंत म्हणाला, ‘टी. व्ही.ला हात लावू नको, बरणी हातात घेऊ नको, फुटून जाईल ...’ शोभा जाधव हिने पाण्याचे महत्त्व सांगितले. या कविसंमेलनात विद्यार्थ्यांसोबत बालकवी अशोक पाटील आणि संभाजी चौगुलेही सहभागी झाले. तर कथाकथन सत्रात बालसाहित्यिक मा. ग. गुरव आणि मनीषा झेले यांनी विद्यार्थ्यांसोबत आपल्या कथा सादर केल्या.या संमेलनाची जबाबदारी सविता प्रभावले, संजय गुरव, मानसी सरनाईक, अमर चोपडे, सागर संकपाळ, आण्णापा माळी, अमर जगताप या विद्यार्थ्यांनी सांभाळली.‘गांधी फॉर टुमारो’पथनाट्याने समारोपवर्धा येथील सर्वोदयी शाळेतील शिक्षकाने लिहिलेल्या ‘गांधी फॉर टुमारो’ या पथनाट्याने या संमेलनाचा आज, शनिवारी समारोप होत आहे. हे पथनाट्य संजय हळदीकर यांनी दिग्दर्शित केले आहे. तीन सत्रांत आज, शनिवारी पथनाट्यासह गीतगायन, पर्यावरणविषयक लघुपट आणि लोकनृत्यांचा समावेश आहे. निर्मला शितोळे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

वारकºयांच्या वेशात विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडीया संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. वारकºयांच्या वेशात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातून ग्रंथदिंडी काढली. तिचे उद्घाटन शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार यांनी केले. यावेळी मेघराज खराडे, शिवतेज खराडे, मुुख्याध्यापक प्रवीण काटकर उपस्थित होते.