शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

शेतकरी आंदोलनास साहित्यिकांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 15:06 IST

Farmer strike, literature, kolhapurnews केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकांनी पाठिंबा दिला आहे. महेश एलकुंचवार, राजन गवस, रा.रं बोराडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा पाठिंबा जाहीर केला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनास साहित्यिकांचा पाठिंबा एलकुंचवार, गवस, बोराडे यांच्यासह मान्यवरांचा समावेश

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकांनी पाठिंबा दिला आहे. महेश एलकुंचवार, राजन गवस, रा.रं बोराडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा पाठिंबा जाहीर केला आहे.पत्रकात म्हटले आहे, सुरुवातीला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठीहल्ला करत सरकारने अमानुषपणे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तरीही निर्धाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मुळातच देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता, न जुमानता मोदी सरकारने ही विधेयके मंजूर केली.

या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करत गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष करून सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह आहे.

सरकारने तातडीने या शेतकऱ्यांशी संवाद साधावा. महात्मा जोतीराव फुले यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटलांपर्यंत अनेक धुरिणांनी याच मातीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढे दिले. त्यामुळे आम्ही आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे कर्तव्य समजतो.यांनी दिला पाठिंबाया पाठिंबा देणाऱ्यांमध्ये महेश एलकुंचवार, राजन गवस, रा. रं. बोराडे, तारा भवाळकर, नंदा खरे, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, भास्कर चंदनशिव, रंगनाथ पठारे, चंद्रकांत पाटील, इंद्रजित भालेराव, प्रफुल्ल शिलेदार , प्रमोद मुनघाटे, उल्का महाजन, सुरेखा दळवी, जयंत पवार, कृष्णात खोत, आसाराम लोमटे, प्रवीण बांदेकर, अतुल देऊळगावकर, नारायण कुळकर्णी-कवठेकर, आनंद विंगकर, बालाजी सुतार, अजय कांडर, संदेश भंडारे, संजीव चांदोरकर, अरुणा सबाने, नंदकुमार मोरे, गोविंद काजरेकर, संदीप जगदाळे, प्रसाद कुमठेकर यांचा समावेश आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर