शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कागलमध्ये वीज कोसळली, सहाजण जखमी; नशीब बलवत्तर सर्वजण बचावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 12:41 IST

कागल : दुपारी कागल परिसरात आलेल्या वळीवाच्या पावसापासून वीटभट्टीतील विटा भिजू नयेत म्हणून प्लास्टिक कागद बांधत असताना काही फूट ...

कागल : दुपारी कागल परिसरात आलेल्या वळीवाच्या पावसापासून वीटभट्टीतील विटा भिजू नयेत म्हणून प्लास्टिक कागद बांधत असताना काही फूट अंतरावर वीज कोसळल्याने लिंगनूर दुमाला (ता. कागल) येथील सहाजण बेशुद्ध झाले. नशीब बलवत्तर म्हणून सर्वजण बचावले आहेत. ही घटना दुपारी साडेचारच्या दरम्यान येथील जवाहर नवोदय विद्यालयासमोरील माळावर असलेल्या वीटभट्टीवर घडली.सतीश गंगाराम कुभांर, छाया गंगाराम कुभांर, साधना सतीश कुंभार,( रा. शाहुनगर लिंगनूर दुमाला) नागेश अशोक कासोटे (रा. कागल) उमेश विजय घाऊट (शाहुनगर) दीपक सदाशिव शिरोळे (रा. लिंगनूर दुमाला) अशी जखमींची नावे आहेत. उमेश घाऊट वर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की सतीश कुंभार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी नवा आवा लावला आहे. दुपारी वळीवाचा पाऊस येणार याचा अंदाज आल्याने ते आई-पत्नीसह तेथे आले होते. विटा भिजून नुकसान होऊ नये म्हणून या आव्यावर प्लास्टिकचा कागद बांधण्याचे काम सुरू केले. त्यासाठी उमेश, नागेश आणि दीपक या मित्रांनाही बोलवून घेतले. हे सर्वजण प्लास्टिकचा कागद बांधत असताना पाऊसही सुरू होता.काही कळायच्या आत वीस फुटाच्या अंतरावर जोरदार कडकडाट करीत वीज कोसळली. या धक्क्याने हे सहाजण बेशुद्ध होऊन खाली पडले. जवळच एका वीटभट्टीजवळ असलेले तानाजी कुंभार, धनाजी कुंभार, अमर माने, राघू पाटील यांना हा प्रकार दिसला. त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यापैकी तिघांना कोल्हापूर येथे दाखल केले. एक तासाभरात सर्वजण शुद्धीवर आले.

काही कळायच्या आत घडले..या घटनेतील जखमी दीपक शिरोळे म्हणाले की, आम्ही कागद बांधत असताना विजेचा प्रचंड झोळ आणि कानठळ्या बसविणारा आवाज झाला. शरीरात काहीतरी घुसल्यासारखे झाले आणि आम्ही बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आलो तेव्हा दवाखान्यात होतो. अजूनही मनात भीती बसली आहे. देवाच्या कृपेने आम्ही बचावलो आहोत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर