शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

हवेच्या कुशीत आकाशाला अंगाई !

By admin | Updated: July 20, 2014 23:18 IST

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच दानशूरांचे असंख्य हात पुढे

एअरबेड भेट : मीनाक्षी स्पेशालिटी हॉस्पिटलकडून महिनाभराची औषधेही प्रदानसातारा : शेंदुरजणे येथील आकाश मुकुंद येवले या चिमुकल्याच्या उपचारांसाठी मदतीचे असंख्य हात धावून आले आहेत. मीनाक्षी हॉस्पिटलचे डॉ. प्रताप गोळे यांनी रुग्णाची गरज ओळखून एअर बेड आणि एक महिना पुरेल एवढा औषधांचा साठा अशा दहा हजार रुपये किमतीच्या वस्तू आकाशला मदत म्हणून दिल्या आहेत.आकाशला सध्या ‘बेडरेस्ट’ घेणे गरजेचे आहे. त्याच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर विश्रांतीसाठी ‘एअर बेड’ आवश्यक असल्याचे सांगितले. ‘एअर बेड’ची किंमत जास्त आहे. तो खर्च कमी व्हावा आणि आजारपणात रुग्णाला आधार देणारी एखादी वस्तू दिली तर ते अधिक चांगले, या उद्देशाने आकाशला एअर बेड आणि एक महिन्याची औषधे दिली, असे डॉ. गोळे यांनी सांगितले. ‘घनतिमिरी दिसेना वाट... कुटुंब शोधतेय कवडसा’ या शीर्षकाखाली दि. १४ च्या ‘लोकमत’मध्ये आकाशच्या आजाराविषयी आणि कुटुंबाच्या झालेल्या कोंडीविषयी वृत्तांत प्रसिद्ध झाला होता. खेळण्या-बागडण्याच्या वयात मेंदूत ताप गेल्याने आकाश अंथरुणाला खिळला. त्याच्या उपचारांसाठी प्रचंड खर्च होणार असल्याने आणि येवले कुुटुंबाची तशी परिस्थिती नसल्याने त्याचे आईवडील प्रचंड तणावाखाली होते.‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच दानशूरांचे असंख्य हात पुढे आले. सर्व स्तरातील लोकांनी आपापल्या परीने आकाशला केली. शाळकरी मुलांनीही खाऊचे पैसे आकाशसाठी दिले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पॉकेटमनीमधून पैसे दिले. आता त्याच्या उपचारास लागणारी बहुतांश रक्कम येवले कुटुंबीयांकडे जमा झाली आहे. मीनाक्षी हॉस्पिटलतर्फे डॉ. राहुल साळुंखे यांच्या हस्ते ही मदत प्रदान करण्यात आली. त्यांच्याा बरोबर मीनाक्षी मेडिकलचे जितेंद्र साळुंखे आणि मीनाक्षी डायग्नोस्टिक सेंटरचे प्रदीप पालकर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आकाशच्या वडिलांकडे एअर बेड आणि एक महिना पुरतील एवढी औषधे दिली. आकाशच्या उपचारांना पुरेल एवढी रक्कम आता जमा झाली असून, ‘लोकमत’च्या पुढाकाराने आकाशचे आईवडील आता तणावमुक्त झाले आहेत. आकाश बरा होऊन खेळू लागेल, अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. (प्रतिनिधी)आकाशचे वडील ड्रायव्हर आहेत. आमच्यासारखंच कुटुंब आहे आकाशचं. अशा कुटुंबाची आर्थिक ओढाताण आम्हाला समजते. आम्ही ती जवळून पाहिली आहे. अशा परिस्थितीत गंभीर आजार झाल्यास कुटुंबाची मनस्थिती कशी होते, हे आम्ही जाणतो. त्यामुळेच आकाशची परिस्थिती पाहून आम्ही भाजीवाल्यांनी त्याच्यासाठी मदत गोळा केली.- गायत्री माने, भाजी विक्रेती