शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्यांमधील वाद मिटवण्यात आयुष्य संपले: पी. एन. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:23 IST

कोल्हापूर : कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष-पदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत महादेवराव महाडिक- सतेज (बंटी) पाटील, प्रकाश आवाडे-जयवंतराव आवळे, बजरंग देसाई-दिनकरराव जाधव यांच्यासह ...

कोल्हापूर : कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष-पदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत महादेवराव महाडिक- सतेज (बंटी) पाटील, प्रकाश आवाडे-जयवंतराव आवळे, बजरंग देसाई-दिनकरराव जाधव यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील वादाला मलाच दोषी धरण्यात आले. यामुळे माझे राजकीय नुकसान झालेच; पण दोषी धरण्यातच माझे आयुष्य संपल्याची सल कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बोलून दाखविली.प्रदेश कॉँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पी. एन. पाटील यांचा सत्कार रविवारी कॉँग्रेस कमिटीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पक्षांतर्गत गटबाजीवर बोट ठेवत माजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, ‘कॉँग्रेसचा पराभव करण्याची हिंमत शिवसेना-भाजपमध्ये नाही. आम्हीच एकमेकांच्या पायात पाय घातल्याने जिल्ह्यात एकही आमदार नाही. आवाडे आणि आम्ही हातात हात घालून काम करण्याचे ठरवले आहे. हाच धागा पकडत प्रकाश आवाडे म्हणाले, नेत्यांमधील मतभेद मिटले असून पक्षसंघटना मजबूत करणार आहे. कोणीच पायात पाय घालण्याचे राजकारण करणार नाही.’ आवाडे यांना मध्येच थांबवत ‘जिल्हा परिषदेची सत्ता तुमच्यामुळेच गेली,’ अशी विचारणा ज्येष्ठ कॉँग्रेस कार्यकर्ते आप्पासो खोचगे यांनी केल्याने तणाव निर्माण झाला. प्रकाश आवाडे यांनी तितक्याच संयमाने उत्तर देत, ‘मने मोकळी झाली पाहिजेत.’ असे ते म्हणाले. विचारल्याबद्दल खोचगेंचे कौतुक करत, ‘जिल्हा परिषदेत सत्ता का आली नाही हे जयवंतराव आवळे व पी. एन. पाटील यांना विचारा. माझे आयुष्य कॉँग्रेसमध्ये गेले असताना राहुल आवाडेंना पक्षाची उमेदवारी डावलली जाते, त्यावेळी काय वाटले असेल? पण तेही विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाजीराव खाडे दिल्लीत, पी. एन. पाटील मुंबईत, सतेज पाटील विधान परिषदेत आणि आपण जिल्ह्णात आहे, सगळे मिळून विरोधकांची नमवूया,’ असे आवाहन आवाडे यांनी केले. पी. एन. पाटील म्हणाले, कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची वीस वर्षे आवाडे-आवळे, महाडिक-सतेज पाटील, बजरंग देसाई-दिनकरराव जाधव, उदयसिंगराव गायकवाड-संजीवनीदेवी गायकवाड, विक्रमसिंह घाटगे-संजय घाटगे यांच्यातील वादाला मलाच दोषी धरले.यामुळे माझे राजकीय नुकसान झाले असून दोषी धरण्यातच माझे आयुष्य संपले. ‘प्रकाशअण्णा, राहुलला उमेदवारी मी नाकारली नाही.इचलकरंजी नगराध्यक्षपद आवळेंना हवे होते, पण ते तुम्ही दिले नसल्याने आवळेंनी त्यांच्या मतदारसंघात राहुल यांचे तिकट कापले, यात माझा दोष काय? आजपर्यंत सूडबुद्धीने राजकारण कधी केले नाही. येथून पुढे तुमच्या खांद्याला खांदा लावून कॉँग्रेस बळकटीचे काम करू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.प्रदेशाध्यक्ष चेष्टा करीत : आवाडे-आवळे वाद केवळ जिल्हापुरता मर्यादित नव्हता. तो राज्य व राष्टÑीय पातळीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे प्रदेश कॉँग्रेस कमिटीत गेलो की ‘या आवाडे-आवळे’ अशी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चेष्टा करीत असल्याचे आवळे यांनी सांगितले.जिल्हा परिषदेत चूक झालीजिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत चूक झाल्याचे सांगत ‘राहुल (राहुल पी. पाटील) पुढील अडीच वर्षांसाठी कोणतीही चिठ्ठी येऊ दे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा कॉँग्रेस-राष्ट्रवादीचाच होईल,’ असे आवाडे यांनी सांगितले.पक्षात घ्या;पण जरा पारखूनपक्षातून बाहेर गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी मिळून याबाबत निर्णय घेऊया, असे आवाडे यांनी सांगितले. यावर ‘साहेब, पक्षात घ्या; पण जरा पारखून. संधिसाधूपासून सावध रहा,’ असे विश्वास शिंदे (कणेरी) यांनी सांगितले.